Akshay Shinde : माझ्या मुलाला फसवलंय! बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या वडिलांचा दावा-badlapur case twist sensational claim of akshay shindes father says attempting to implicate my son in crime ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Akshay Shinde : माझ्या मुलाला फसवलंय! बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या वडिलांचा दावा

Akshay Shinde : माझ्या मुलाला फसवलंय! बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या वडिलांचा दावा

Aug 22, 2024 11:47 AM IST

Badlapur Crime : बदलापूर प्रकरणी मोठा ट्विट समोर आला आहे. आरोपी मुलाच्या वडिलांनी खळबळजनक दावा केला आहे. त्यांनी त्यांचा मुलगा निर्दोष असल्याचं म्हटलं आहे.

माझ्या मुलाला फसवलयं! बदलापूर अत्याचार प्रकरणावर आरोपी अक्षय शिंदेच्या वडिलांचा खळबळजनक दावा
माझ्या मुलाला फसवलयं! बदलापूर अत्याचार प्रकरणावर आरोपी अक्षय शिंदेच्या वडिलांचा खळबळजनक दावा

Badlapur School Crime Case : बदलापूर येथील नामांकित शाळेत दोन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी मोठा जनक्षोभ उसळला होता. आंदोलकांनी आरोपीला फाशी देण्यात यावी या मागणीसाठी मोठे आंदोलन केले. रेल्वे रोखली. हे आंदोलन हिंसक झाले. यानंतर कठोर कारवाईचे आश्वासन सरकारने दिले. या प्रकरणी आरोपी अक्षय शिंदेला अटक करण्यात आली आहे. मात्र, त्याच्या वडिलांनी खळबळजनक दावा केला आहे. त्यांचा मुलगा निर्दोष असल्याचं त्यांनी म्हटलं असून त्याला या प्रकरणात फसवलं असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणी पोलिस काय भूमिका मांडणार या कडे लक्ष लागले आहे.

बदलापूर येथील एका नामांकित शाळेत अक्षय शिंदे नामक सफाई कामगाराने दोन मुलींचे लैंगिक शोषण केले. या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले. मंगळवारी बदलापूर येथे झालेल्या हिंसक आंदोलनामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. सध्या बदलापूरमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. दरम्यान, आरोपी अक्षय शिंदेच्या खवई या गावातील घरावर काही नागरिकांनी काल रात्री हल्ला करत तोडफोड केली आहे. मात्र, या प्रकरणी आरोपी अक्षय शिंदेच्या वडिलांनी मोठा दावा केला आहे. आई-वडील व लहान भावाशी मोबाईल फोनवरुन काहींनी संपर्क साधला असून त्यांनी धक्कादायक माहिती दिली आहे. त्यांनी दावा केला आहे की, अक्षय शिंदे हा निरपराध आहे. त्याने मुलींसोबत असा कोणत्याही प्रकार केलेला नाही. त्याला फसवण्यात येत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीसही बोलतांना त्यांनी असा कोणताच प्रकार घडला नसल्याचं सांगितलं आहे. या प्रकारात त्याला फसवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

आरोपी शिंदेच्या कुटुंबियांनाही मारहाण

आरोपी अक्षय शिंदे यांच्या मुखई येथील घराची तोडफोड करण्यात आली आहे. तर त्याच्या घरातील सगळ्यांना मारहाण करण्यात आली. यानंतर जेव्हा ते पोलिस ठाण्यात गेले तेव्हा त्यांना अक्षयनं दोन मुलींवर अत्याचार केल्याचंन सांगण्यात आलं. दरम्यान, अक्षयच्या कुटुंबीयांनी त्याची पुन्हा मेडिकल चाचणी करावी अशी मागणी केली आहे.

मुखई येथील घराची केली तोडफोड

आरोपी अक्षय शिंदे यांच्या बदलापूरच्या लैंगिक अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे हा बदलापूर पूर्वच्या मुखाई गावातील घराची तोडफोड करण्यात आली आहे. या सोबतच त्याच्या नातेवाईकांच्या घराची देखील ग्रामस्थांनी तोडफोड केली आहे. त्याची तीन लग्न झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितलं असून त्याच्या तिन्ही बायका त्याला सोडून गेल्या आहेत.

विभाग