Akshay Shinde: अक्षय शिंदेचा मृत्यू कशामुळे झाला, गोळ्या कुठे लागल्या? पोस्टमार्टम रिपोर्टमधून खुलासा-badlapur case akshay shinde postmortem report shot in head died due to excessive bleeding ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Akshay Shinde: अक्षय शिंदेचा मृत्यू कशामुळे झाला, गोळ्या कुठे लागल्या? पोस्टमार्टम रिपोर्टमधून खुलासा

Akshay Shinde: अक्षय शिंदेचा मृत्यू कशामुळे झाला, गोळ्या कुठे लागल्या? पोस्टमार्टम रिपोर्टमधून खुलासा

Sep 24, 2024 11:30 PM IST

Akshayshinde: अक्षय शिंदेच्या मृतदेहाचेजवळपास ७ तास पोस्ट मॉर्टम चालू होतं. याच्या रिपोर्टमधून अनेक खुलासे करण्यात आले आहेत. तसेच अक्षयचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याची माहिती उघड झाली आहे.

अक्षय शिंदेचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? 
अक्षय शिंदेचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? 

Akshay shinde postmortem report : बदलापूर लैंगिकअत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा समोवारी पोलिसांनी एन्काऊंटर केला. मुंब्रा बायपास रोडवर झालेल्याया घटनेने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या या कारवाईवर विरोधकांबरोबरच समाजातील अन्य घटकांकडून शंका उपस्थित केली जात आहे. बदलापूर प्रकरणाची सीबीआयकडून चौकशी केली जाणार आहे. दरम्यान अक्षय शिंदेचा सात तास चाललेल्या पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आता समोर असून त्याच्या मृत्यूचा खुलासा करण्यात आला आहे.

दुसरीकडे अक्षय शिंदेच्या वडिलांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करत संरक्षणाची मागणी केली आहे. अक्षय शिंदेच्या मृतदेहाचेजवळपास ७ तास पोस्ट मॉर्टम चालू होतं. याच्या रिपोर्टमधून अनेक खुलासे करण्यात आले आहेत. तसेच अक्षयचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याची माहिती उघड झाली आहे. बदलापूर लैगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास जेजे रुग्णालयातनेण्यात आला होता. या प्रकारणाचा तपास करण्यासाठी ८ विशेष पोलीस अधिकाऱ्यांची टीम तैनात करण्यात आली होती. पोस्ट मार्टम प्रक्रियेची व्हिडिओग्राफी करण्यात आली असून मुंबई जेजे रुग्णालयाच्या पाच डॉक्टरच्या पॅनलने शवविच्छेदन केलं आहे.

आता हा गुन्हा सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे. आजच सीआयडीच्या टीमने घटनास्थळाची पाहणी केली. सकाळी साडे आठ वाजता सुरू झालेले शवविच्छेदन अखेरीस संध्याकाळी पूर्ण झालं व शवविच्छेदन अहवाल तयार करण्यात आला.  गोळीबारानंतर अतिरक्तस्त्रावामुळे अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. तसेच अक्षय शिंदेच्या डोक्यात एक  गोळी घुसल्याचे अहवालात म्हटले आहे. प्राथमिक शवविच्छेदन अहवाल मुंब्रा  पोलिसांना सुपूर्द करण्यात आला आहे.

 

अक्षय शिंदेच्या वडिलांची उच्च न्यायालयात याचिका -

अक्षय शिंदेच्या वडिलांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करत हा एन्काऊंटर बनावट असल्याचा  दावा केला आहे. उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली एसआयटी स्थापन करून या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरचे राजकीय लाभार्थी कोण? असा सवाल या याचिकेच्या माध्यमातून करण्यात आला आहे. त्याचबरोबर या याचिकेत अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरसह बदलापूर शाळेतील दोन चिमुकलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेचीही नव्याने चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Whats_app_banner