ठाणे पोलिसांच्या चकमकीत ठार झालेल्या बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या वडिलांनी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. शिंदे याच्या वडिलांनी आपल्या मुलाच्या मृत्यूची विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) चौकशी करण्याची मागणी केली आहे. बदलापूर शाळेच्या व्यवस्थापनाचे हे षड्यंत्र असल्याचा आरोप शिंदे यांच्या आई आणि काकांनी केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय शिंदे (वय २४) याच्याविरोधात त्याच्या दुसऱ्या पत्नीने दाखल केलेल्या गुन्ह्यात ठाणे गुन्हे शाखा तळोजा मध्यवर्ती कारागृहातून त्याला चौकशीसाठी घेऊन जात होती. शिंदे याच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम ३७७ (अनैसर्गिक लैंगिक संबंध) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी त्याला घेऊन जाणारी गाडी मुंब्रा बायपासजवळ पोहोचली असता शिंदे याने सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश मोरे यांचे पिस्तूल हिसकावून त्यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या, त्यातील एक गोळी मोरे यांच्या पायाला लागली.
त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी आरोपीवर गोळी झाडली, जी त्याच्या डोक्यात लागली. गंभीर अवस्थेत अक्षय शिंदे याला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले.
Akshay Shinde: अक्षय शिंदेचा मृत्यू कशामुळे झाला, गोळ्या कुठे लागल्या? पोस्टमार्टम रिपोर्टमधून खुलासा
अक्षय शिंदेचा पोलिस चकमकीत मृत्यू झाल्याने सत्ताधारी महायुती सरकार आणि विरोधी महाविकास आघाडी यांच्यात राजकीय शाब्दिक चकमक सुरू झाली आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांच्या या कारवाईचा बचाव केला आहे.
अक्षय शिंदेच्या माजी पत्नीने त्याच्यावर लैंगिक हिंसाचाराचा आरोप केला होता आणि या आरोपांच्या चौकशीसाठी पोलीस त्याला घेऊन जात होते. त्याने पोलिस कर्मचाऱ्याची बंदूक हिसकावून घेतली. पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
हे चित्रपटाच्या लॉन्चिंगसाठी केले का? अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी ठाकरे गटाचा सवाल, कोर्टात जाण्याचा इशारा
विरोधकांकडून चकमकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून, कट रचल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही हत्या किंवा चकमक मुख्य आरोपीला (शाळा व्यवस्थापनाला) वाचवण्यासाठी करण्यात आली आहे. चौकीदार एका पोलिसाची बंदूक हिसकावून बंद शस्त्र चालवतो, हे कितपत पटण्याजोगे आहे? हा मूलभूत प्रश्न आहे,' अशी टीका शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरची राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) तसेच न्यायालयीन चौकशी केली जाणारआहे, अशी माहिती ठाण्याचे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी मंगळवारी दिली. जे घडले, ते धक्कादायक असून, अक्षयने पोलिसांवर केलेल्या गोळीबारासाठी त्याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा आणि त्याच्या आकस्मिक मृत्यूचा असे दोन गुन्हे मुंब्रा पोलिस ठाण्यात दाखल झाल्याचेही आयुक्तांनी सांगितले.