Bachchu Kadu: दिव्यांगांना फसवलं, बच्चू कडू यांनी अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली!-bachchu kadu slaped government officer in chhatrapati sambhajinagar ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Bachchu Kadu: दिव्यांगांना फसवलं, बच्चू कडू यांनी अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली!

Bachchu Kadu: दिव्यांगांना फसवलं, बच्चू कडू यांनी अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली!

Aug 08, 2024 06:56 PM IST

bachchu kadu slaped government officer: संभाजीनगर दौऱ्यात बच्चू कडू यांनी एका अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली.

बच्चू कडू यांनी अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली!
बच्चू कडू यांनी अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली!

Bachchu Kadu News: प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू संभाजीनगर दौऱ्यात आहे. या दौऱ्यात बच्चू कडू यांनी एका अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावल्याची माहिती समोर आली. छत्रपती संभाजीनगरच्या गेस्ट हाऊसमध्ये हा सर्व प्रकार घडला. राज्य सरकारच्या योजनेतून दिव्यांगांना इ-रिक्षावाटप करण्यात आल्या होत्या. मात्र, त्या खराब असल्याच्या तक्रारी आल्यानंतर बच्चू कडूंनी अधिकाऱ्यांना बोलावून त्यांची कानउघडली केली. बच्चू कडू यांनी अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावल्याचा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला.

राज्य सरकारच्या योजनेतून छत्रपती संभाजी नगरमध्ये दिव्यांगांना इ-रिक्षावाटप करण्यात आल्या. मात्र, ज्या दिवशी या रिक्षा दिल्या, त्याच दिवशी त्या बंद पडल्या. याबाबत बच्चू कडू यांच्याकडे तक्रारी आल्या. यानंतर बच्चू कडू यांनी संबंधित अधिकारी आणि कंपनीचे कर्मचाऱ्यांना रिक्षाची पाहणी करण्यासाठी बोलावून घेतले. मात्र, कंपनीने पाठवलेल्या कर्मचाऱ्याला पुरेशी माहिती नव्हती. त्यामुळे बच्चूकडू संतापले आणि त्यांनी अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली. तुला काही माहिती नाही तर तू येथे कशाला आला? असा प्रश्न विचारत बच्चू कडूने अधिकाऱ्याला झापले.

यासंदर्भात बोलताना बच्चू कडू म्हणाले की, 'सरकारी योजनेतून जवळपास ५०० इ-रिक्षांचे वाटप करण्यात आले. परंतु, यातील २५० ते ३०० रिक्षा खराब आहेत, अशा मला तक्रारी आल्या. या सगळ्या नादुरुस्त रिक्षा परत घ्याव्यात. कानशिलात लगावलेला अधिकारी नसून कंपनीचा कर्मचारी होता.'

पूजा खेडकर प्रकरणावर बच्चू कडूंची संतापजनक प्रतिक्रिया

'पूजा खेडकर प्रकरणानंतर बनावट प्रमाणपत्राचा आधार घेत अनेकजण अधिकारी झाल्याची चौकशीत निष्पन्न झाले. यावर बच्चू कडू यांनी तिखट प्रतिक्रिया दिली. दिव्यांग प्रमाणपत्रावर डल्ला मारणाऱ्यांचा कोथळा बाहेर काढला पाहिजे, असे बच्चू कडू हिंगोलीत बोलताना म्हणाले. पूजा खेडकर यांचे प्रमाणपत्र बोगस आढळल्यानंतर जवळपास दिडशे जणांनी बनावट प्रमाणपत्राचा आधार घेत नोकरी मिळवल्याची माहिती मिळाली आहे. याबाबत आम्ही मुख्य सचिवांना पत्र पाठवले आहे. येत्या २२ ऑगस्टपर्यंत दोषींविरोधात कारवाई करण्याची आमची मागणी आहे. ज्यांच्या घरात अधिकारी कर्मचारी आहेत,त्यांनी हे धाडस केले आहे. दिव्यांग प्रमाणपत्रावर डल्ला मारणाऱ्यांचा कोथळा बाहेर काढला पाहिजे', अशा शब्दात बच्चू कडू यांनी संताप व्यक्त केला.

विभाग