मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  BACARDI Weekender : पुण्यात रंगणार बकार्डी वीकेंडर महोत्सव; ४० हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कलाकार घेणार सहभाग
BACARDI Weekender
BACARDI Weekender

BACARDI Weekender : पुण्यात रंगणार बकार्डी वीकेंडर महोत्सव; ४० हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कलाकार घेणार सहभाग

24 November 2022, 10:55 ISTNinad Vijayrao Deshmukh

BACARDI NH7 Weekender : पुण्यात आज पासून बकार्डी NH7 वीकेंडर हा म्युझिक फेस्टिव्हल सुरू होत आहे. या महोत्सवाची मेजवानी पुणेकरांना मिळणार आहे. यात तब्बल ४० हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कलाकार सहभागी होणार आहे.

पुणे : पुणेकरांना संगीताची खास मेजवानी मिळणार आहे. बकार्डी इंडियातर्फे आज पासून पुढील पाच दिवस बकार्डी NH7 वीकेंडर हा म्युझिक फेस्टिव्हल पुण्यात आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात ४० हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कलाकार सहभागी होणार आहे. महोत्सवाचे यंदाचे हे १३ वे वर्ष आहे.

ट्रेंडिंग न्यूज

भारतीय सांगितला चालना देण्यासाठी तसेच तरुणांना संगीत सादर करण्यासाठी स्टेज उपलब्ध व्हावा या उद्देशाने बकार्डी NH7 वीकेंडर या संगीत सोहळ्याचे आयोजन करण्यात येतं. आज पासून (दि २५) या सोहळ्याला सुरुवात होत आहे. गेल्या काही वर्षांपासूण आयोजित होणारा हा सोहळा संगीतप्रेमींचे खास आकर्षण आहे.

BACARDI इंडियाच्या भारतातील प्रमुख समीक्षा उनियाल म्हणाल्या, हा संगीत महोत्सव आयोजित करताना आम्हाला आनंद होत आहे. या सोहळ्यात प्रतिभावंत गायक आणि कलाकारांना संधी दिली जाणार आहे. हा सांस्कृतिक महोत्सव संगीताच्या प्रसारासाठी आयोजित करण्यात आला आहे. या सोबतच या सोहळ्यात येणाऱ्या प्रेक्षकांना देशातील तसेच परदेशातील विविध संगीत प्रकाराचा आस्वाद या महोत्सवात घेता येणार आहे.

हा उत्सव कलाकारांना संधी देण्यासाठी पर्वणी आहे. वीकेंडरमध्ये कलाकारांचा शोध आणि त्यांची शैली ही प्रेक्षकांपुढे सादर केली जाणार आहे. हा सोहळा भारतीय संगीत महोत्सवांच्या इतिहासातील एक अभिमानास्पद सोहळा आहे, असे देखील समीक्षा उनियाल म्हणाल्या.

 

विभाग