baba siddique : बाबा सिद्दिकींच्या पार्थिवावर सरकारी इतमामात मरीन लाइन्सच्या बडा कबरस्तानमध्ये आज रात्री होणार दफनविधी
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  baba siddique : बाबा सिद्दिकींच्या पार्थिवावर सरकारी इतमामात मरीन लाइन्सच्या बडा कबरस्तानमध्ये आज रात्री होणार दफनविधी

baba siddique : बाबा सिद्दिकींच्या पार्थिवावर सरकारी इतमामात मरीन लाइन्सच्या बडा कबरस्तानमध्ये आज रात्री होणार दफनविधी

Oct 13, 2024 11:20 AM IST

baba siddique shot dead : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते व माजी आमदार बाबा सिद्धीकी यांची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. त्यांच्या पार्थिवावर आज रात्री ८.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

बाबा सिद्दिकींच्या पार्थिवावर मरीन लाइन्स बडा कबरस्तान आज रात्री होणार दफनविधी
बाबा सिद्दिकींच्या पार्थिवावर मरीन लाइन्स बडा कबरस्तान आज रात्री होणार दफनविधी (PTI)

baba siddique shot dead : राज्याचे माजी राज्यमंत्री तथा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी (Baba Siddique Shot Dead) यांची शनिवारी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली असून आणखी एका आरोपीचा शोध घेतला जात आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी तिसऱ्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान, आरोपी हे बिश्नोई गँगशी संबंधित असल्याची कबुली त्यांनी दिली आहे. तरी पोलिस आणखी तपास करत आहेत. दरम्यान, आज बाबा सिद्दिकी यांच्या पार्थिवावर सरकारी इतमामात रात्री ८.३० वाजता दफनविधी करण्यात येणार आहेत.

महाराष्ट्राचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. त्यांना उपचारासाठी लीलावती रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांना बाबा सिद्दीकी यांच्या छातीत दोन गोळ्या लागल्याचे आढळले. रात्री ९.३० वाजता मुंबईतील खेर नगर येथील मुलाच्या कार्यालयाबाहेर गोळीबार केला. त्यांच्या गाडीवर गोळी झाडण्यात आली. त्यांना तातडीने लीलावती रुग्णालयात नेण्यात आले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले.

लीलावती रुग्णालयाचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. नितीन गोखले म्हणाले, 'बाबा सिद्दीकी यांना जखमी अवस्थेत रात्री साडेनऊ वाजता लीलावती रुग्णालयात आणण्यात आले. त्याच्या छातीवर दोन गोळ्या लागल्या होत्या. त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. रात्री ११ वाजून २७ मिनिटांनी त्यांना मृत घोषित करण्यात आले. शवविच्छेदनानंतर गोळ्यांची संख्या निश्चित केली जाईल.

सिद्दीकी यांचा मृतदेह रविवारी सकाळी सहा वाजता लीलावती रुग्णालयातून कूपर रुग्णालयात नेण्यात आला. या ठिकाणी शवविच्छेदन करण्यात आले. बाबा सिद्दीकी यांना १५ दिवसांपूर्वीच जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. त्यानंतर त्यांना 'वाय' श्रेणीची सुरक्षा देण्यात आली. काल संध्याकाळी त्यांचे चिरंजीव आमदार जीशान सिद्दीकी मतदारांची भेट घेत असताना त्यांच्या कार्यालयाबाहेर गोळीबार झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडण्यात चार जणांचा सहभाग होता.

गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, एका संशयिताला बाबा सिद्दीकीवर लक्ष ठेवून होता. तर इतर तीन शूटर्सना त्याचे लोकेशन सांगण्याची जबाबदारी देण्यात आली होती. एकूण सहा गोळ्या झाडण्यात आल्या, त्यापैकी दोन गोळ्या बाबा सिद्दीकी यांच्या छातीवर लागल्या. दसऱ्यासाठी परिसरात पोलिस तैनात करण्यात आले होते. यामुळे पोलिसांनी तातडीने दोन्ही हल्लेखोरांना पकडले. मात्र, अन्य दोन संशयित फरार झाले. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

बाबा सिद्दिकी यांच्यावर रात्री सरकारी इतमामात  ८.३० वाजता दफनविधी 

दरम्यान, बाबा सिद्दिकी यांच्यावर मुस्लीम धर्मानुसार सरकारी इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. बाबा सिद्दीकी यांचे पार्थिव मारिन लाईन येथील बडा कब्रस्तान येथे आणले जाईल. त्यानंतर रात्री ८.३० वाजता त्यांच्या पार्थिवावर दफनविधी करण्यात येथील. दफनविधी पूर्वी बाबा सिद्दीकी यांचे पार्थिव बांद्रा येथील राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. यावेळी अनेक नेते मंडळी बॉलिवूड सेलिब्रिटी तसेच राजकीय नेते उपस्थित राहणार आहेत. मुस्लीम धर्मानुसार बाबा सिद्दिकी यांच्यासाठी नमाज ए जनाजा म्हणजे शेवटची प्रार्थना करण्यात येणार आहे. ही प्रार्थना रात्री ७ वाजता त्यांच्या मकबा हाईट या राहत्या केली जाणार आहे. त्यानंतर बडा कब्रस्तान येथे दफनविधी करण्यात येणार आहे.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर