Baba Siddiqui Murder : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर राज्यात खळबळ माजली आहे. या प्रकरणी आतापर्यंत तिघांना अटक केली आहे. पोलिसांनी एकाला पुण्यातून अटक केली आहे तर आणखी एकाचा शोध घेतला जात आहे. सिद्दीकी हत्या प्रकरणाच्या तपासात अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. या हत्येमागे बिश्नोई गँगचा हात असल्याचे स्पष्ट झाले आहे. . दरम्यान, अटक करण्यात आलेल्या आरोपींनी कोर्टात खळबळजनक खुलासा केला आहे. बाबा सिद्दीकी यांच्या सोबत त्यांचा मुलगा आमदार झीशान सिद्दीकी यांना देखील ठार मारण्याचे आदेश हल्लेखोरांनी दिले होते.
मुंबईतील वांद्रे पूर्व येथे निर्मलनगर भागात बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री हत्या झाली. चार हल्लेखोरांनी पिस्तुलातून गोळ्या झाडात बाबा सिद्दीकी यांची हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तर पुण्यातून प्रवीण लोणकर याला मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे. तर पोलिस सध्या त्याचा भाऊ शुभम लोणकरचा शोध घेत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी हरियाणाच्या गुरमेल बलजीत सिंग आणि उत्तर प्रदेशच्या धर्मराज कश्यपला अटक केली आहे, त्यापैकी गुरमेल हा गुन्हेगारी रेकॉर्ड असलेला आरोपी आहे. तिसरा आरोपी शिवानंद कुमार हा घटनास्थळावरुन पसार झाला आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींना कोर्टात हजार करण्यात आलं. या आरोपींनी खळबळजनक खुलासा केला आहे. बाबा सिद्दीकींबरोबर त्यांचा मुलगा आमदार झिशान सिद्दीकींना देखील ठार मारण्यासाठी सुपारी देण्यात आली होती. मात्र, ते कार्यालयात गेल्याने त्यांचा जीव वाचला. सुपारी देणाऱ्याने दोघांना एकत्र ठार मारता आले नाही तर जो आधी समोर दिसेल त्याला मारावे असे आदेश दिले होते, अशी माहिती आरोपींनी दिली होती.
बाबा सिद्दीकी आणि झिशान सिद्दीकी यांची हत्या करण्यासाठी आरोपई ही कुर्ला येथून वांद्रे येथे रोज जात होते. या साठी त्यांनी कुर्ला या ठिकाणी भाड्याने खोली देखील घेतली होती. आरोपई ऑटो रिक्षाने जात होते. त्यांनी पाळत ठेवत सिद्दीकी यांची बरीच माहिती मिळवली. शनिवारी बाबा सिद्दीकी व झिशान सिद्दीकी दोघेही एकाच ठिकाणी होते. मात्र, झिशान हे कार्यालयात असल्याने ते थोडक्यात बचावले.
सध्या पोलिस सध्या फरार शिवानंद कुमार याचा शोध घेत आहे. हा आरोपी शनिवारी रात्रीपासून फरार आहे. त्याला पकडण्यासाठी हरियाणा, उत्तर प्रदेश व दिल्लीत पथके रवाना करण्यात आले आहे आहेत.