इफ्तार 'किंग' बाबा सिद्दिकींच्या पार्टीत असायची सेलिब्रिटींची मांदियाळी; संपवले होते सलमान-शाहरुखमधील कोल्ड वॉर!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  इफ्तार 'किंग' बाबा सिद्दिकींच्या पार्टीत असायची सेलिब्रिटींची मांदियाळी; संपवले होते सलमान-शाहरुखमधील कोल्ड वॉर!

इफ्तार 'किंग' बाबा सिद्दिकींच्या पार्टीत असायची सेलिब्रिटींची मांदियाळी; संपवले होते सलमान-शाहरुखमधील कोल्ड वॉर!

Published Oct 12, 2024 11:55 PM IST

Baba Siddique Iftar Parties : बॉलिवूडमधील अनेक सेलेब्रिटी त्यांच्या अत्यंत जवळचे होते. ते दरवर्षी ग्रँड इफ्तार पार्टी द्यायचे. या पार्टीत सलमान खान, शाहरूख खानसह बॉलिवूडमधील अनेक दिग्गज हजेरी लावायचे.

इफ्तार 'किंग' बाबा सिद्दिकी
इफ्तार 'किंग' बाबा सिद्दिकी

बाबा सिद्दीकी केवळ एक राजकारणीच नव्हते तर बॉलिवूडमध्येही ते खूप प्रसिद्ध होते. दरवर्षी त्यांच्या इफ्तार पार्टीची चर्चा असायची. या पार्टीसाठी बॉलिवूड सेलिब्रिटी, छोट्या पडद्यावरील अनेक स्टार्सही सामील व्हायचे. शाहरूख खान, सलमान खान हेही आवर्जून सिद्दीकी यांच्या पार्टीत शामिल होतात. सलमान खान याचे बाबा सिद्दीकीशी जवळचे संबंध होते. सलमान व शाहरुख खानमधील वाद बाब सिद्दीकी यांनी  दोघांना इफ्तार पार्टीत बोलावून मिटवला होता. त्याचबरोबर काँग्रेस व अन्य राजकीय पक्षातील बडे नेतेही त्यांच्या इफ्तार पार्टीत हजेरी लावत असते. 

बॉलिवूडमधील अनेक सेलेब्रिटी त्यांच्या अत्यंत जवळचे होते. ते दरवर्षी ग्रँड इफ्तार पार्टी द्यायचे. या पार्टीत सलमान खान, शाहरूख खानसह बॉलिवूडमधील अनेक दिग्गज हजेरी लावायचे.

सलमान-शाहरुखमधील कोल्ड वॉर मिटवले –

बाबा सिद्दीकी यांनी एकेकाळी असे काम केले जे बॉलीवूड फॅन्स स्वप्नातही कल्पना करू शकत नव्हते. सलमान खान आणि शाहरुख खान जे कधी काळी मित्र होते मात्र कोणत्या तरी कारणाने एकमेकांचे शत्रु बनले होते. दोघांमधील वाद इतका टोकाला गेला होता की, दोघे एकमेकांचे चेहराही पाहायचे नाहीत. हा वाद पाच वर्षे चालला. जर एखाद्या इव्हेंटमध्ये सलमान खान असला तर तेथे शाहरुख खान जाणे टाळायचा. हे शत्रुत्व २०१३ मध्ये संपले. जेव्हा बाबा सिद्दीकी यांनी इफ्तार पार्टीमध्ये दोघांची भेट घडवून त्यांच्यातील शत्रत्व संपवले होते.

बाबा सिद्दीकी यांनी १९९९, २००४ आणि २००९ मध्ये वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली होती. २०१४ च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात काँग्रेस सोडून बाबा सिद्दीकी एनसीपी (अजित पवार गट) मध्ये सामील झाले होते. ते मागील ४८ वर्षापासून काँग्रेसमध्ये होते. ते तीन वेळा आमदार तसेच राज्य मंत्रीही राहिले आहेत. पहिल्यांदा त्यांनी मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकली होती.

बाबा सिद्दीकी यांची संपत्ती किती?

एका अहवालानुसार, बाबा सिद्दीकी यांची एकूण संपत्ती अंदाजे ७.२ दशलक्ष असल्याचा दावा करण्यात येत आहे. २०१८ मध्ये बाबा सिद्दीकी यांच्या घरावर ईडीचा छापा पडला होता. त्यावेळी जवळपास ४६२ कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली होती. बाबा सिद्दीकी यांना अलिशान गाड्यांची आवड आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांच्याकडे मर्सिडीज बेंझ S क्लास, बीएडब्ल्यू ७ सीरिज आणि रोल्स रॉयस फँटम कार असल्याचे सांगितले जाते. 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर