Baba Siddiqui Murder case updat : अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी धर्मराज कश्यप हा अल्पवयीन असल्याचं त्याच्या वकिलाने कोर्टात म्हटलं होतं. मात्र, बचाव पक्षाने याला विरोध केला. यानंतर कोर्टाने आरोपीची ऑसिफिकेशन टेस्ट करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याची ऑसिफिकेशन टेस्ट केली. यात तो अल्पवयीन नसल्याचं स्पष्ट झालं आहे. एखाद्याचे वय शोधण्यासाठी ऑसिफिकेशन चाचणी केली जाते. हाडांच्या काही चाचण्यांच्या आधारे त्या व्यक्तीचे वय किती आहे हे निश्चित केलं जातं. दरम्यान आरोपीला २१ ऑक्टोबर पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.
अजित पवार गटाचे नेते बाब सिद्दिकी यांची शनिवारी रात्री गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्यांच्या मुलगा आमदार झिशान सिद्दिकींच्या कार्यालयासमोर बाबा सिद्दिकी यांच्यावर तीन हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार करत त्यांची हत्या केली. पोलिसांनी या दोन आरोपींना अटक केली. तर एक आरोपी फरार होता. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी कोर्टासमोर हजर केलं होतं. गुरनैल सिंह याला २१ पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तर दुसरा आरोपी धर्मराज हा अल्पवयीन असल्याचं त्याच्या वकिलाने कोर्टात म्हटलं होतं. यामुळे आरोपीचं खरं वय तपासण्यासाठी ऑसिफिकेशन टेस्ट करण्याचे आदेश न्यायालयानं दिले होते. त्यानुसार, टेस्ट करण्यात आली असून तो अल्पवयीन नसल्याचं सिद्ध झालं आहे. चाचणी अहवालानंतर कश्यपला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला २१ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा तपास मुंबई गुन्हे शाखा करत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवकुमार असे आरोपीचे नाव असून तो अद्याप फरार आहे. रविवारी पोलिसांनी आणखी एका आरोपीला अटक केली. प्रवीण लोणकर असे आरोपीचे नाव आहे. त्याचे वय सुमारे २८ वर्षे आहे. खुनाच्या कटात त्याचा सहभाग होता. त्यानेच या हत्येसाठी धर्मराज कश्यप आणि शिवकुमार गौतम यांची निवड केल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची त्यांचा आमदार मुलगा झीशान सिद्दीकी याच्या कार्यालयाबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. बाबा सिद्दीकी यांच्या छातीवर दोन गोळ्या झाडण्यात आल्या. त्यांना तातडीने लीलावती रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. रविवारी त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली, ज्यात बड्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली. बाबा सिद्दीकी यांची हत्या दु:खद आणि दुर्दैवी आहे. मुंबई पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. या कटात सहभागी असलेल्या उर्वरित लोकांनाही लवकरच अटक करण्यात येणार आहे. याशिवाय ज्यांना धमक्या मिळत आहेत, त्यांची सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे. ही राज्य सरकारची जबाबदारी आहे, असा आरोप विरोधकांनी सरकारवर केला आहे.
संबंधित बातम्या