ऐशो-आरामाचे आयुष्य जगण्याचा मोह.. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील शूटरच्या वडिलांनी सांगितली शिवकुमारची कहाणी
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ऐशो-आरामाचे आयुष्य जगण्याचा मोह.. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील शूटरच्या वडिलांनी सांगितली शिवकुमारची कहाणी

ऐशो-आरामाचे आयुष्य जगण्याचा मोह.. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील शूटरच्या वडिलांनी सांगितली शिवकुमारची कहाणी

Nov 11, 2024 08:21 PM IST

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार शिवकुमार गौतम यालाही अटक करण्यात आली आहे. शिवकुमारच्या वडिलांचे म्हणणे आहे की, मुलाला लक्झरी लाइफ आणि झटपट पैसे कमावण्याचे वेड होते.

बाबा सिद्धीकी हत्या प्रकरणातील आरोपी
बाबा सिद्धीकी हत्या प्रकरणातील आरोपी

राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार शिवकुमार गौतम यालाही पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. शिवकुमार आणि अन्य दोन शूटरनी १२ ऑक्टोबर रोजी बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. आणखी दोन शूटर यापूर्वीच पकडले गेले आहेत. शिवकुमार महिनाभरापासून पोलिसांपासून लपून राहिला होता. यूपी पोलिसांसह यूपी एसटीएफ आणि मुंबई क्राइम ब्रँचही या कारवाईत सहभागी झाले होते. 

शिवकुमार व त्याच्या चार साथीदारांना भारत-नेपाळ सीमेजवळील बहराइच येथून अटक करण्यात आली. मुलाच्या अटकेबाबत शिवकुमार यांच्या वडिलांनी निवेदन दिले आहे. त्याने सांगितले की, मुलाला लक्झरी लाइफ आणि झटपट पैशाची क्रेझ होती, ज्यामुळे तो गुन्हेगारीच्या दुनियेत ढकलला.

बाबा सिद्दीकी (६६) यांच्यावर १२ ऑक्टोबरच्या रात्री मुंबईतील वांद्रे परिसरातील खेर नगर येथील त्यांचे पुत्र आणि आमदार जीशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर तिघांनी गोळ्या झाडल्या. त्यांना तातडीने लीलावती रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी मुख्य शूटर शिवकुमार गौतम आणि त्याच्या चार साथीदारांना उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली आहे. शिवकुमार हा बहराइचचा रहिवासी आहे. शिवकुमार गौतम च्या अटकेनंतर बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्यांची एकूण संख्या २३ झाली आहे.

शिवकुमार गौतम, अनुराग कश्यप, ज्ञान प्रकाश त्रिपाठी, आकाश श्रीवास्तव आणि अखिलेंद्र प्रताप सिंह अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

आरोपीच्या वडिलांचा खुलासा -

शिवकुमार गौतमचे वडील बाळकृष्ण कुमार सांगतात की, त्यांच्या मुलाला ऐशोआरामाचे जीवन जगायचे होते. आलिशान जीवन जगण्याच्या इच्छेने त्याची पावले गुन्हेगारीकडे वळली. त्याला लवकरात लवकर पैसे कमवायचे होते आणि त्यामुळे तो गुन्हेगारीच्या दुनियेत ढकलला गेला. आपला मुलगा दोषी सिद्ध झाला तर त्याला खुनीसारखी वागणूक मिळायला हवी, असेही ते म्हणाले. 

लॉरेंस बिश्नोईशी संबंध असल्याची कबुली -

१२ ऑक्टोबर रोजी बाबा सिद्दीकी यांच्या हत्येत सहभाग असल्याची कबुली दिली. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंध असल्याची कबुली त्याने दिली आहे. पुण्यात भंगार विक्रेते म्हणून काम करत असताना त्याची ओळख शुभम लोणकर याच्याशी झाली आणि त्याची ओळख लॉरेन्स बिश्नोई चा भाऊ अनमोल बिश्नोई याच्याशी झाली.

गौतमच्या म्हणण्यानुसार, अनमोलने त्याला हत्येसाठी १०  लाख रुपये, तसेच दर महिन्याच्या खर्चासाठी पैसे देण्याचे आश्वासन दिले होते. लोणकर आणि मोहम्मद यासीन अख्तर यांनी ही योजना अंमलात आणण्यासाठी गौतमला शस्त्रे, काडतुसे, सिमकार्ड आणि मोबाइल फोन पुरवले होते. गौतमने सांगितले की, त्याने त्याच्या दोन साथीदारांसह मुंबईत सिद्दीकीची रेकी केली. १२ ऑक्टोबर रोजी नवरात्र उत्सवाच्या गर्दीच्या वातावरणात त्यांनी सिद्दीकी यांची हत्या केली.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर