बाबा सिद्दीकींची हत्या लॉरेन्स बिश्नोईच्या गँगनं केली नाही? पोलिसांच्या माहितीमुळं प्रकरणात नवा ट्विस्ट
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  बाबा सिद्दीकींची हत्या लॉरेन्स बिश्नोईच्या गँगनं केली नाही? पोलिसांच्या माहितीमुळं प्रकरणात नवा ट्विस्ट

बाबा सिद्दीकींची हत्या लॉरेन्स बिश्नोईच्या गँगनं केली नाही? पोलिसांच्या माहितीमुळं प्रकरणात नवा ट्विस्ट

Oct 21, 2024 06:02 PM IST

बाबा सिद्दीकी प्रकरणात लॉरेन्स बिश्नोईचा कोणताही हात नसल्याचा पोलिसांना संशय आहे. शुभम लोणकर ऊर्फ शुब्बू याने लॉरेन्स बिश्नोई या नावाने या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती.

बाबा सिद्दींची हत्या लॉरेन्स बिश्नोईच्या सांगण्यावरून नाही, पोलिसांचा दावा
बाबा सिद्दींची हत्या लॉरेन्स बिश्नोईच्या सांगण्यावरून नाही, पोलिसांचा दावा

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट येताना दिसत आहे. या खून प्रकरणात लॉरेन्स बिश्नोईचा कोणताही हात नसल्याचा पोलिसांना संशय आहे. शुभम लोणकर ऊर्फ शुब्बू याने लॉरेन्स बिश्नोई या नावाने या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती. त्यानंतरच बाबा सिद्दीकी प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई टोळीचे नाव पुढे आले. मात्र, बिश्नोईने या हत्येची सुपारी घेतली नसावी, असा संशय पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. याचे कारण म्हणजे बिश्नोईशी संबंधित कोणत्याही विशिष्ट व्यक्तीने अद्याप याची जबाबदारी घेतली नाही. लॉरेन्स बिश्नोई टोळीने जेव्हा जेव्हा काही केले आहे, तेव्हा त्याच्याशी संबंधित लोकांनी ते उघडपणे स्वीकारले आहे, किंवा सरळ-सरळ नाकारले आहे, असे याआधीचे रेकॉर्ड सांगते.

लॉरेन्स बिश्नोई सध्या गुजरातमधील साबरमती तुरुंगात आहे. मुंबई गुन्हे शाखा त्याची चौकशी करण्यास असमर्थ आहे. अशा तऱ्हेने बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना लॉरेन्सचा या प्रकरणात सहभाग असल्याची खात्री नाही. आरोपी शुभम लोणकर, शिवकुमार गौतम आणि जीशान अख्तर यांनी स्वत: बाबा सिद्दीकी हत्येची सुपारी घेतल्याचा पोलिसांना संशय आहे. सिद्दीकी यांच्या हत्येमागे झोपडपट्टी पुनर्वसनाचा मुद्दा कारणीभूत असावा, असाही पोलिसांना संशय आहे.

पोलीस या प्रकरणी अजूनही विविध शक्यता गृहित धरून तपास करत आहेत. लॉरेन्स बिश्नोईशी संबंधित दोन-तीन खास व्यक्तींच्या अद्याप काही प्रतिक्रिया समोर आलेल्या नाहीत. मग तो लॉरेन्सचा भाऊ अनमोल असो, त्याचा साथीदार रोहित गोदारा असो किंवा कॅनडात राहणारा गोल्डी ब्रार असो. सिद्दीकी हत्या प्रकरणात सर्वांनी मौन बाळगले आहे. आतापर्यंत असे घडले नव्हते. हे लोक एखाद्या प्रकरणात आपला सहभाग आहे की नाही, याचा दावा करत होते. पण आत्तापर्यंतच्या मौनामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. यावर्षी एप्रिल महिन्यात सलमानच्या घराबाहेर गोळीबार झाला तेव्हा अनमोल बिश्नोईने त्याची जबाबदारी घेतली होती. पुढच्या वेळी गोळीबार झाला तर गोळ्यांचे लक्ष्य भिंती आणि घरे नसतील, असेही तो म्हणाला होता. त्याने थेट सलमान खानला धमकी दिली होती.

याशिवाय आणखी एक गोष्ट आहे ती म्हणजे पोलिसांच्या सिद्धांताला बळकटी देणारी. ती म्हणजे लोणकरची पार्श्वभूमी. ती मराठी शाळेतून बारावी उत्तीर्ण आहे. हिंदी आणि पंजाबी भाषेवरील त्याची पकड खूपच मर्यादित आहे. यामुळे त्याच्या सोशल मीडिया पोस्टवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सोशल मीडिया पोस्टमधील प्रकरण अन्य कोणीतरी लोणकर यांना फॉरवर्ड केल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यानंतर लोणकर याने ते फेसबुकवर पोस्ट केले आणि नंतर डिलीट केले.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर