मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sanjay Raut : फडणवीसांनी नागपूर स्टेशनवरचा फोटो टाकला, आम्ही तर..., 'कारसेवे'वरून राऊतांचा पलटवार

Sanjay Raut : फडणवीसांनी नागपूर स्टेशनवरचा फोटो टाकला, आम्ही तर..., 'कारसेवे'वरून राऊतांचा पलटवार

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 21, 2024 11:49 PM IST

Sanjay Raut on Devendra Fadnavis : त्यांनी नागपूर स्टेशनचा फोटो टाकला, आम्ही बाबरीच्या प्रत्यक्ष ऑपरेशनचे फोटो टाकतो, अला पलटवार संजय राऊत यांनी फडणवीसांना लगावला आहे.

Sanjay Raut on Devendra Fadnavis
Sanjay Raut on Devendra Fadnavis

देवेंद्र फडणवीस यांनी ३० वर्षांपूर्वी कारसेवेसाठी अयोध्येला गेल्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यावेळच्या वर्तमानपत्रात छापून आलेला एक फोटो फडणवीस यांनी शेअर केला आहे. १९९२ च्या डिसेंबर महिन्यात नागपूरहून अयोध्येला जाणाऱ्या कारसेवकांची रेल्वे स्टेशनवर मोठी गर्दी उसळली आहे. त्या गर्दीत फडणवीस दिसत आहेत. यावरून संजय राऊत यांनी पलटवार केला आहे. 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा अयोध्येला जातानाचा फोटो शेअर केल्यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गट आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. उद्धव ठाकरे, संजय राऊत हे असा फोटो महाराष्ट्राच्या जनतेला दाखवू शकतात का? राम मंदिराच्या आंदोलनात उद्धव ठाकरे स्वत: त्या आंदोलनात सहभागी झाले होते, असा एकतरी फोटो दाखवू शकतात का?’ असा सवाल नितेश राणे यांनी विचारला आहे.

यावर संजय राऊत यांनीही पलटवार केला आहे. शिवसेनेचं वय समजण्याइतकं देवेंद्र फडणवीस यांचं वय नव्हतं, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. हा फोटो शेअर करताना फडणवीसांनी म्हटले आहे की, मी मुर्खांना उत्तर देत नाही, त्यामुळे हे कुठलंही उत्तर नाही. नागपूरहून प्रसारित होणाऱ्या नवभारत या वृत्तपत्राने त्यावेळचा अंक पाठवला. आमच्या संग्रही हा फोटो असल्याचं त्यांनी सांगितलं. फोटोग्राफरचे आभार मानण्यासाठी हा फोटो ट्वीट केला,’ असं फडणवीस म्हणाले.

संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, शिवसेनेचं योगदान समजण्याइतकं देवेंद्र फडणवीस यांचं वय नव्हतं, अशा शब्दात संजय राऊत यांनी हल्ला चढवला. त्यांनी नागपूर स्टेशनचा फोटो टाकला,  आम्ही बाबरीच्या प्रत्यक्ष ऑपरेशनचे फोटो टाकतो, एकमेकांवर आरोप करण्याचा हा दिवस नाही. ते शिवसेनेचं योगदान काय विचारतात म्हणून हा प्रश्न आहे, असा पलटवार संजय राऊत यांनी केला आहे.


ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी फडणवीसांनी शेअर केलेल्या फोटोच्या सत्यतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी म्हटले की, अशापद्धतीचे फोटो हे आता मॉर्फ करून कोणालाही काढता येतात.

WhatsApp channel