मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ayodhya Ram Mandir : आपले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अयोध्येला जाणार नाहीत! राज्यातील आजचे कार्यक्रम काय?

Ayodhya Ram Mandir : आपले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अयोध्येला जाणार नाहीत! राज्यातील आजचे कार्यक्रम काय?

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jan 22, 2024 10:27 AM IST

Ayodhya Ram Mandir: संपूर्ण देशात आज राम मंदिर प्रतिष्ठापणा सोहळा साजरा केला जात आहे. या सोहळ्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. मात्र, या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अनुपस्थित राहणार आहेत.

Ayodhya Ram Mandir
Ayodhya Ram Mandir

CM Eknath shinde, DCM Devendra Fadanvis will not go For Ram Temple Inauguration संपूर्ण देशात आज राम मंदिर प्रतिष्ठापणा सोहळा साजरा केला जात आहे. देशभरातील मंदिरांना आकर्षण सजावट करण्यात आली आहे. अयोध्यानगरीत देखील सकाळपासून विविध विधी केले जात आहे. दरम्यान, या सोहळ्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. मात्र, या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे अनुपस्थित राहणार आहेत.

Maharashtra Naxal : तब्बल १३ वर्षांपासून पुण्यातून बेपत्ता असलेला नक्षली कमांडर संतोष शेलार पेंटर पोलिसांना शरण

अयोध्येतील राम मंदिर सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या अयोध्या येथे पोहचणार आहेत. राम नगरीत रविवार पासून अनेक व्हीव्हीआयपी पाहुण्यांचे आगमन सुरू झाले आहे. अयोध्येतील या विशेष सोहळ्याला सुमारे ७००० मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील निमंत्रण देण्यात आले होते. तर अजित पवार यांना देखील हे निमंत्रण देण्यात आले होते.

Ayodhya Prana Pratishtha: पाऊले चालती अयोध्येची वाट! आलिया-कतरिनासह बॉलिवूड कलाकार अयोध्यला रवाना

मात्र, आज श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या सोहळ्याला अनुपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज सकाळी ११ वाजता ठाण्यातील कोपीनेश्वर मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या महाआरतीला उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी ५ वाजता दादर ते वडाळा शोभायात्रेतही ते सहभागी होतील. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस हे नागपुरातील एका मंदिरात आरती करणार आहेत. फडणवीस हे नागपूर येथील कोराडी येथील महालक्ष्मी जगदंब देवस्थानात जाणार असून दर्शन व राम प्रतिष्ठापना निमित्त प्रसाद वाटप करणार आहेत. यानंतर ११ वाजता ते नागपूर येथील राममंदिर येथे दर्शन घेणार आहेत. यानंतर दुपारी ३.४५ वाजता ते अमरावती येथे जाणार आहेत. या ठिकाणी ते मेळघाट येथील महिला बचत गटांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे विक्री केंद्र मेळघाट हाट मॉलला भेट देणार आहेत. तर अमरावती येथील हनुमान गढी येथे ते दुपारी ४.१५ वाजता कारसेवकांचा सत्कार करणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल ट्विटर पोस्ट करत या सोहळ्याला जाणार नसल्याचे घोषित केले होते. त्यांनी राम मंदिर उभरल्याबद्दल आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले होते. तसेच देशातील रामभक्त आणि हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार केल्याबद्दल त्यांचे आभार देखील मानले होते. अयोध्येमध्ये सोमवारी श्री प्रभू रामचंद्र यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत असून या ऐतिहासिक आणि नेत्रदीपक सोहळ्याचे आम्हाला निमंत्रण आहेच. देशवासीयांसाठी अभिमानास्पद अशा या अभूतपूर्व क्षणाचे साक्षीदार फक्त मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजितदादा पवार अशा तिघांनीच होण्याऐवजी संपूर्ण मंत्रीमंडळ, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी आणि राज्यातील रामभक्त अशा सर्वांना घेऊन प्रभू श्रीराम यांचं दर्शन आम्ही घेणार आहोत. अयोध्येतल्या दर्शनाची तारीख आणि वेळ लवकरच ठरवत आहोत असे देखील शिंदे यांनी पोस्ट करत सांगितले होते.

WhatsApp channel