Viral News: सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल, याचा काही नेम नाही. सोशल मीडियावर दररोज वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर एका ऑटोचा एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यावर विवाहित पुरुषांसाठी एक मॅसेज लिहिण्यात आला आहे, जो पाहिल्यानंतर अनेकांना हसू येत आहे. तर, मग ऑटो चालकाने त्याच्या रिक्षाच्या मागे असा काय लिहिले आहे, जे वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे.
रस्त्यावरून जाताना काहीही आगळे-वेगळे दिसल्यास लोक त्याचे फोटो किंवा व्हिडिओ बनवतात. यानंतर तो फोटो सोशल मीडियावरही व्हायरल होतो. सध्या सध्या अशाच एका ऑटोच्या मागे लिहिलेल्या मॅसेजच्या फोटोने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. व्हायरल फोटोमध्ये एक पिवळ्या रंगाची रिक्षा रस्त्यावरून जात असताना कोणीतरी तिचा पाठीमागून फोटो काढला, जिथे 'भगवान के बाद पत्नी ही होती है, जिसकी लाठी मे आवाज नही होती', असे लिहिले होते. आता हा फोटो सोशल मीडिया प्रचंड व्हायरल होत आहे.
सध्या व्हायरल होत असलेला हा फोटो नेमका कधीचा आणि कुठला आहे, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही. परंतु, हा फोटो मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म एक्सच्या @BabaXwale या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये 'या ऑटो चालकाला संपूर्ण ज्ञान प्राप्त झाले आहेत', असे लिहिण्यात आले. आतापर्यंत अनेकांनी या फोटोला लाइक केले आहे. एका युजरने या फोटोवर आपली प्रतिक्रिया देताना असे म्हटले आहे की, 'भावाने, आपला अनुभव सांगितला आहे वाटते.'
काही दिवसांपूर्वी असाच एका ऑटो रिक्षा मागे लिहिलेल्या मेसेजचा फोटो व्हायरल झाला होता. ज्यात असे लिहिले होते की, 'शाळा चांगली असली की मुले शिकतात असे नाही. मुले चांगली असली की कुठल्याही शाळेत शिकतात. आई बापाच्या कष्टाची जाणीव असणारी मुले कधीच वाया जात नाही.' व्हायरल होत असलेली ही पोस्ट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @marathi_memer नावाच्या अकाउंटसह शेअर करण्यात आली.