मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या पैठणमधील सभेसाठी प्रत्येकी ३०० रुपये?, व्हायरल ऑडिओमुळं खळबळ

Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या पैठणमधील सभेसाठी प्रत्येकी ३०० रुपये?, व्हायरल ऑडिओमुळं खळबळ

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Sep 12, 2022 11:40 AM IST

Eknath Shinde In Paithan : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेसाठी महिलांना प्रत्येकी ३०० रुपये देण्यात येणार असल्याचा ऑडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Eknath Shinde In Paithan Auranagabad Visit
Eknath Shinde In Paithan Auranagabad Visit (HT)

Eknath Shinde In Paithan Auranagabad Visit : मंत्रिमंडळाची बैठक पार पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहे. यावेळी जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा घेतील. त्यानंतर ते मंत्री संदीपान भुमरे यांच्या पैठण विधानसभा मतदारसंघात जाहीर सभा घेणार आहे. परंतु या सभेसाठी पैसे देऊन लोक गोळा केले जात असल्याची धक्कादायक माहिती एका व्हायरल ऑडिओ क्लिपमधून समोर आली आहे. त्यामुळं खळबळ उडाली आहे. यावरूनच आता राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी मंत्री भुमरेंवर टीका केली आहे.

व्हायरल होत असलेल्या ऑडिओमध्ये एका व्यक्ती भुमरेंच्या कार्यकर्त्याला आजच्या सभेसाठी दोन ट्रॅक्टरभरून महिलांना पाठवतो. तुम्ही किती पैसे देणार असं विचारत आहे. तर भुमरेंचा कार्यकर्ता त्यांना प्रतिव्यक्ती २५० रुपये देणार असल्याचं सांगत आहे. परंतु दुसरा व्यक्ती प्रतिव्यक्ती ३०० रुपये देण्याची मागणी करत आहे. व्हायरल होत असलेल्या या ऑडिओ क्लिपची 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' पुष्टी करत नाही.

भुमरेसाहेब लय मोठे व्यक्ती झालेत, आता त्यांनी जास्त पैसे द्यावेत…

व्हायरल ऑडिओमध्ये भुमरेंच्या कार्यकर्त्याला पैशांची मागणी करणारा व्यक्ती बोलताना म्हणाला की, परिसरातील महिला सांगतायंत की, आता भुमरे साहेब मोठे व्यक्ती झालेत, त्यांनी सभेसाठी यावेळी पैसे वाढवून द्यायला हवेत. त्यावर भुमरेंचा कार्यकर्ता म्हणाला की, दोन मिनिटं थांबा, मी याबाबत जबाबदार लोकांना विचारतो आणि तुम्हाला कळवतो. अशा प्रकारचं संभाषणाची क्लिप सध्या व्हायरल होत असल्यानं औरंगाबाद जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पैठणमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. ज्या मैदानावर कधी काळी बाळासाहेब ठाकरेंनी सभा गाजवली होती. त्याच पैठणमधील मैदानावर मुख्यमंत्री शिंदे सभा घेणार आहे. सभेआधी प्रशासनानं तालुक्यातील ५२ गावांच्या अंगणवाडी कर्मचारी आणि मदतनीसांना मुख्यमंत्र्यांच्या सभेला हजर राहण्याचा आदेश काढला होता. त्यानंतर त्यावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी टीका केली होती. त्यानंतर आता त्यांनी प्रति ३०० रुपये देऊन शिंदे गटाला माणसं बोलवावी लागत असल्याचा आरोप केला आहे.

Ambarnath Rains: मुसळधार पावसाचा फटका; अंबरनाथमध्ये घराची भिंत कोसळून तिघे जखमी

काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी पैठणमध्ये जाहीर सभा घेतली होती. त्यावेळी त्याच्या सभेला पैठणकरांनी मोठी गर्दी केली होती. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर संदीपान भुमरेंनी पैठण शहरात रॅली काढली होती. परंतु त्याकडे लोकांनी पाठ फिरवली होती. त्यामुळं आता मुख्यमंत्र्यांच्या सभेला पैसै देऊन माणसं गोळा केली जात असल्याचा आरोप विरोधकांनी शिंदे गटावर केला आहे.

WhatsApp channel