पुण्यात मद्यधुंद ऑडी चालकाची दुचाकीला धडक! तरुणाला ३ किमी पर्यंत नेले फरफटत, तिघांना अटक
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  पुण्यात मद्यधुंद ऑडी चालकाची दुचाकीला धडक! तरुणाला ३ किमी पर्यंत नेले फरफटत, तिघांना अटक

पुण्यात मद्यधुंद ऑडी चालकाची दुचाकीला धडक! तरुणाला ३ किमी पर्यंत नेले फरफटत, तिघांना अटक

Dec 04, 2024 03:32 PM IST

Pimpri Chinchwad Crime : पुण्यात पिंपरीचिंचवड येथे एका ऑडी कारमधील काही तरुणांनी मोटारसायकलला धडक दिली असून दुचाकीवरील तरुणाला तब्बल ३ किमी पर्यंत फरफटत नेले. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.

पुण्यात मद्यधुंद ऑडी चालकाची दुचाकीला धडक! तरुणाला ३ किमी पर्यंत नेले फरफटत, तिघांना अटक
पुण्यात मद्यधुंद ऑडी चालकाची दुचाकीला धडक! तरुणाला ३ किमी पर्यंत नेले फरफटत, तिघांना अटक

Pimpri Chinchwad Crime : पुण्यात हायप्रोफाईल हिट अँड रन आणि रॅश ड्रायव्हिंगच्या वाढत्या वाढत चालल्या आहेत. पोर्शे प्रकरण ताजे असतांना  पुण्यातील चिंचवड परिसरात एका मद्यधुंद ऑडी कार चालकाने  एका मोटारसायकलस्वाराला धडक देऊन दुचाकीवरील तरुणाला तब्बल ३  किलोमीटर पर्यंत फरफटत नेले. ही रात्री ९ च्या सुमारास आकुर्डी येथे मंगळवारी घडली.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेत दुचाकीचालक गंभीर जखमी झाला आहे.  झकारिया मॅथ्यू असे जखमी युवकाचे नाव आहे.  तर कमलेश ऊर्फ अशोक पाटील (वय २३, रा. चिंचवड) असे आरोपी ऑडी चलकाचे नाव आहे.  तर त्याच्या सोबत त्याच्या गाडीत हेमंत चंद्रकांत म्हाळसकर ऊर्फ सोन्या, तळेगाव दाभाडे आणि प्रथमेश पुष्कल दराडे हे देखील होते. या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. ही कार पुष्कल दराडे यांच्या भावाची आहे. मॅथ्यू यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मॅथ्यू हा त्याचा मित्र अनिकेतसोबत दुचाकीवरून जात असताना ऑडी कारने त्याच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. या बाबत  मॅथ्यूने ऑडी चालकाला जाब विचारला. यावेळी आरोपी अशोक पाटीलने त्याच्याशी अरेरावी केली.  यानंतर  मॅथ्यू व  त्याच्या मित्राला त्यांनी मारहाण करण्यास सुरवात केली. मॅथ्यू यांनी दिलेल्या माहितीनुसार, इतर दोन आरोपी आणि एका अनोळखी महिला सहप्रवाशासोबत कारमागे असलेल्या कमलेशने मॅथ्यूला ऑडी कारने चिरडण्याचा प्रयत्न केला. मॅथ्यूने कारच्या बोनेटला चिकटून कसेबसे आपले प्राण वाचवले.  आरोपींनी मॅथ्यूला तब्बल ३ किमी पर्यंत बोनेटवर फरफटत नेले.  आकुर्डी रेल्वे स्थानकावरील संभाजी चौकातून त्यांनी गाडी वेळाने पळवली. दरम्यान,  ऑडीमध्ये बसलेल्या एका तरुणीला  सोडण्यासाठी त्यांनी कार  वीजनगरयेथील मंगल मेडिकलजवळ थांबली. यावेळी मॅथ्यू बोनेटवरुन  पडले. 

याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम १०९, ११५ (२), ३५२ आणि ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक शत्रुघ्न माळी म्हणाले, 'पीडितेच्या तक्रारीवरून आम्ही सीसीटीव्ही फुटेज तपासले. आरोपींची ओळख पटवून त्यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यांनी मद्यपान केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असले तरी प्रयोगशाळेच्या अहवालाची आम्ही वाट पाहत आहोत, असे तपास अधिकाऱ्याने सांगितले.

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर