onion exoprt ban : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातली आहे. ही बंदी पुढील वर्ष ३१ मार्च पर्यंत राहणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे कांदा उत्पादक संतप्त झाले आहे. कांद्याचे सर्व लिलाव ठप्प झाले आहे. निर्यातीस पाठवण्यात येणारे तब्बल १७० कंटेनर हे मुंबईत अडकून पडले आहे. यामुळे हा कांदा सडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, कांदा निर्यातीच्या प्रश्नी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भेट घेतली असून या प्रश्नी तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
केंद्र सरकारने ३१ मार्च २०२४ पर्यंत कांदा निर्यातबंदी केली आहे. यामुळे शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. सरकारच्या या निर्णयानंतर कांदा उत्पादक संकटात सापडले असून त्यांनी नाशिकच्या लासलगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यात कांदा लिलाव बंद केले आहे. या बंदीचा आजचा तिसरा दिवस आहे.
सर्व कांदा जागेवरच पडून असल्याने चांगला कांदा सडल्याची भीती व्यक्त केली जात आहे. लिलावबंदी असल्याने शेतकरी देखील हवालदिल झाले आहेत. या वर लवकर तोडगा काढण्याची मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, निर्यातीला पाठवण्यात आलेल्या १७० कंटेनर कांदा हा मुंबईत बंदरावर अडकून पडला आहे. हा कांदा देखील खराब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सरकारच्या या निर्णया विरोधात अनेक ठिकाणी आंदोलने देखील सुरू आहे. नाशिकच्या उमराणे येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मुंबई-आग्रा महामार्ग रोखला, कांदा निर्यात बंदीमुळे कांद्याचे दर घटण्याची शक्यता आहे. कांदा निर्यातबंदीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली. त्यांनी कांदा लिलाव बंदी संदर्भात त्यांचाशी चर्चा केली असून यावर तोडगा काढण्याची विनंती केली. तसेच या प्रश्नी सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे गोयल यांनी आश्वासन दिले आहे.
संबंधित बातम्या