Mumbai News: मुंबई महानगरपालिकेने जलवाहिनीची देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी येत्या २९ तारखेला मुंबईतील गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी आणि विलेपार्ले येथे १६ तासांसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत काही भागांमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे बंद होईल. तर, काही भागांमध्ये पाण्याचा दाब कमी होईल. अत्यावश्यक देखभाल क्रियाकलाप सुलभ करण्यासाठी हे उपाय आवश्यक असल्याचे मुंबई महानगरपालिकेने स्पष्ट केले. याआधी २२ मे २०२४ रोजी जलवाहिनीची देखभाल आणि दुरुस्तीचे कामाला सुरुवात केली जाणार होती. परंतु, तांत्रिक अडचणींमुळे हे काम पुढे ढकलण्यात आले.
अंधेरीच्या के पूर्व वॉर्डमध्ये दोन मुख्य जलवाहिन्या जोडण्यासाठी सावंत मार्ग आणि कार्डिनल ग्रेशियस मार्ग जंक्शन ते कार्डिनल ग्रेशियस मार्ग आणि सहार मार्ग जंक्शनपर्यंत हे काम केले जाणार आहे. या कामादरम्यान जुनी खराब न झालेली १२०० मिमी व्यासाची जलवाहिनी काढली जाणार होती. या कामाला येत्या २९ मे रोजी २०२४ रोजी सकाळी ०९.०० वाजता सुरुवात होईल. या कामाला १६ तास अपेक्षित आहेत. म्हणजेच २३ मे रोजी दुपारी ०१.०० वाजेपर्यंत हे काम पूर्ण होईल, असे सांगण्यात आले. या कालावधीत गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी आणि विलेपार्ले येथील काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
मुंबई महानगरपालिकने दिलेल्या माहितीनुसार, जलवाहिनीची देखभाल आणि दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यावर वेरावली जलाशय १,२ आणि ३ च्या पाणीपातळीत लक्षणीय सुधारणा होईल. तसेच अंधेरी पूर्व आणि अंधेरी पश्चिमसह जोगेश्वरी पूर्व आणि जोगेश्वरी पश्चिम आणि विलेपार्ले पूर्व आणि विलेपार्ले पश्चिम येथील पाणीपुरवठ्यात कायमस्वरूपी वाढ होईल.
सी. डी. बर्फीवाला मार्ग, उपाश्रय गल्ली, स्वामी विवेकानंद मार्ग अंधेरी, दाऊद बाग, केव्हणी पाडा, धाकुशेठ पाडा, मालकम बाग, अंधेरी बाजार, भर्डावाडी, आंब्रे गार्डन पंप (सकाळी ७.३० ते दुपारी १२), जुहू-कोळीवाडा, जुहू तारा मार्ग ( सकाळी ९ ते सकाळी ११), जुहू-कोळीवाडा झोन, देवराज चाळ, स्वामी विवेकानंद मार्ग (जेव्हीएलआर ते जोगेश्वरी बस आगार) (सकाळी ११ ते दुपारी १) एस. व्ही. मार्ग जोगेश्वरी भाग – २, के पश्चिम (पाणीपुरवठा बंद), चार बंगला, डी. एन. नगर, जुहू-वेसावे जोडरस्ता (दुपारी १२.१५ ते २.१० चार बंगला झोनमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा), विलेपार्ले (पश्चिम), लल्लूभाई पार्क, लोहिया नगर, विलेपार्ले गावठाण, मिलन सबवे, संपूर्ण जुहू परिसर, व्ही. एम. मार्ग, नेहरू नगर (दुपारी २.३० ते सायंकाळी ४.३०)
मोरागाव, जुहू गावठाण (दुपारी २.३०ते सायंकाळी ४.४०), यादव नगर, सहकार मार्ग, बांदिवली हिल, मोमीन नगर, खजूरवाडी, जोगेश्वरी फाटक, जोगेश्वरी स्थानक मार्ग, कॅप्टन सामंत मार्ग (रात्री ९.३० ते रात्री १२), गिल्बर्ट हिल, सागर सिटी, गावदेवी डोंगरी, जुहू गल्ली, वायरलेस मार्ग, श्रीनाथ नगर (रात्री १० ते मध्यरात्री १२.३०)
त्रिपाठी नगर, मुन्शी कॉलनी, बस्तीवाला कंपाऊंड, कलेक्टर कॉलनी, मातोश्री क्लब, दुर्गा नगर (सकाळी ८ ते ९), दुर्गा नगर, सारीपुत नगर (सकाळी १० ते दुपारी १२), दत्त टेकडी, ओबेराय स्प्लेंडर, केलती पाडा, गणेश मंदिर परिसर, जोगेश्वरी – विक्रोळी जोडरस्ता (सकाळी ९ ते सकाळी ११), बांद्रेकरवाडी, फ्रान्सिसवाडी, मखरानीपाडा, सुभाष मार्ग, चाचा नगर (सकाळी ११ ते दुपारी २), वांद्रे भूखंड, हरी नगर, शिवाजी नगर, पास्कल वसाहत, शंकरवाडी (दुपारी १.३० ते दुपारी ३.४०), विशाल सभागृह, वर्मा नगर, कामगार कल्याण, मांजरेकरवाडी, बिमा नगर, पंथकी बाग, तेली गल्ली, हाजी जुमान चाळ, कोल डोंगरी, जीवा महाले मार्ग, साई वाडी, जीवन विकास केंद्र, शिवाजी नगर, संभाजी नगर, हनुमान नगर, श्रद्धानंद मार्ग, नेहरू मार्ग, तेजपाल मार्ग, शास्त्री नगर, आंबेडकर नगर, काजूवाडी, विलेपार्लेचा बहुतांश भाग (सायंकाळी ५ ते रात्री ८), पंप हाऊस, विजय राऊत मार्ग, पाटीलवाडी, हंजर नगर, झगडापाडा, पारसी वसाहत, जिजामाता मार्ग, गुंदवली हिल, आशीर्वाद चाळ (सायंकाळी ५ ते रात्री ८) जुना नागरदास मार्ग, मोगरपाडा, नवीन नागरदास मार्ग, पारसी पंचायत मार्ग, आर. के. सिंग मार्ग, निकोलसवाडी परिसर (रात्री ८ ते रात्री १०.३०)
बिंबीसार नगर, बांद्रेकरवाडी, वनराई, राज्य राखीव पोलीस दल (एसआरपीएफ) भाग (सायंकाळी ७ ते रात्री ९.३० दरम्यान कमी दाबाने पाणीपुरवठा) राम मंदीर मार्ग, गोरेगाव (पश्चिम) (सायंकाळी ७.४५ ते रात्री ९.१५).