मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Crime:पुण्यात जादूटोणा करत असल्याच्या संशयातून वृद्धाच्या हत्येची सुपारी; तीक्ष्ण हत्याराने वार करून खुनाचा प्रयत्न

Pune Crime:पुण्यात जादूटोणा करत असल्याच्या संशयातून वृद्धाच्या हत्येची सुपारी; तीक्ष्ण हत्याराने वार करून खुनाचा प्रयत्न

Jun 22, 2024 01:47 PM IST

Pune sahakar nagar Crime : पुण्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जादूटोणा करत असल्याच्या संशयातून एका वृद्ध व्यक्तीचा खून करण्याचा कट रचण्यात आला. सुदैवाने हा वृद्ध व्यक्ति या घटनेतून बचवला आहे.

पुण्यात जादूटोणा करत असल्याच्या संशयातून वृद्धाच्या हत्येची सुपारी; तीक्ष्ण हत्याराने वार करून खुनाचा प्रयत्न
पुण्यात जादूटोणा करत असल्याच्या संशयातून वृद्धाच्या हत्येची सुपारी; तीक्ष्ण हत्याराने वार करून खुनाचा प्रयत्न

Pune sahakar nagar Crime : पुण्यात सहकार नगर येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जादूटोणा करत असल्याच्या संशयातून एका वृद्ध व्यक्तीला जीवे मारण्यासाठी तब्बल दोन लाख रुपयांची सुपारी देण्यात आली. आरोपींनी या वृद्ध व्यक्तीवर तीक्ष्ण हत्याराने वार केले असून यात संबंधित वृद्ध व्यक्ति हा गंभीर जखमी झाला आहे. सहकार नगर पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली आहे. सध्या जखमी व्यक्तीची प्रकृती स्थिर आहे. मात्र, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

सागर सतीश कुंभार (वय ४१), तौरस बाळू कारले (वय ४३, दोघे रा. सुपर इंदिरानगर, बिबवेवाडी) व सागर शशिकांत सोनार (वय ३२, रा. मोरे वस्ती, रांका ज्वेलर्समागे, पद्मावती) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सोनू पांडू होडे (६७, रा. मोरे वस्ती, रांका ज्वेलर्समागे, पद्मावती) असे आरोपींच्या हल्ल्यात जखमी झालेल्या वृद्ध व्यक्तीचे नाव आहे.

ट्रेंडिंग न्यूज

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ जून रोजी सोनू पांडू होडे हे पद्मावती येथून जात असतांना त्यांच्यावर तिघांनी कोयत्याने वार केले होते. या घटनेत होडे यांच्या गळ्यावर वार करण्यात आल्याने ते गंभीर जखमी झाले होते. या घटहेत होते हे गंभीर जखमी होऊन रस्त्यावर पडले होते. स्थानिक नागरिकांनी त्यांना तातडीने दवाखान्यात भरती केल्याने ते बचावले. मात्र, जखमी झाल्याने त्यांची प्रकृती ही गंभीर होती. दरम्यान, या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. सहकारनगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत या घटनेचा तपास सुरू केला. सुरवातीला होडे यांना का मारण्याचा प्रयत्न करण्यात आला असावा याची माहिती पोलिसांना नव्हती. मात्र, आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास पथके पाठवली.

तपास पथकाला हल्ला करणारा आरोपी सागर कुंभार याची माहिती मिळाली. तो इंदिरानगर परिसरात राहत असल्याची माहिती मिळाल्यावर तपास पथकातील पोलिस हवालदार अमोल पवार, किरण कांबळे, अमित पदमाळे यांनी त्याला शिताफीने अटक केली. त्याला पोलिस ठाण्यात आणल्यावर चौकशीत त्याने आरोपी सागर सोनार याच्या सांगण्यावरून होडे यांच्यावर हल्ला केल्याचे सांगितले. होडे यांचा खून करण्यासाठी सोनारने दोन लाख रुपयांची सुपारी देखील दिल्याचे त्याने कबूल केले.

यानंतर पोलिसांनी कुंभार, त्याचा साथीदार कारले व सोनार यांना देखील अटक केली. दरम्यान, त्यांची चौकशी केली असता, होडे हे जादूटोणा, भानामती, करणीसारखे प्रकार करत असून, त्यांनी आमचे घर बळाकावण्याचा प्रयत्न केल्याचे आरोपींनी तपासात सांगितले. या साठी त्यांनी होडे यांचा खून करण्याचा कट रचला व यातूनच दोन लाख रुपयांची सुपारी त्यांनी आरोपी कारले व सोनार यांना दिली.

सहायक पोलिस आयुक्त नंदिनी वग्याणी पराजे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळे, गुन्हे शाखेचे निरीक्षक उत्तम भजनावळे, उपनिरीक्षक युवराज पोठरे, बापू खुटवड, अमोल पवार, किरण कांबळे, अमित पदमाळे, बजरंग पवार, विनोद जाधव, महेश मंडलिक, नवनाथ शिंदे, अमित सुतकर, सागर कुंभार आणि विशाल वाघ यांनी या घटनेचा छडा लावला.

WhatsApp channel
विभाग