मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune News : कायद्याचा धाकच उरला नाही! पुण्यात पार्किंगच्या वादातून महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, घटना सीसीटीव्हीत कैद

Pune News : कायद्याचा धाकच उरला नाही! पुण्यात पार्किंगच्या वादातून महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, घटना सीसीटीव्हीत कैद

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Feb 19, 2024 03:42 PM IST

Pune Crime news : पुण्यात कायद्याच्या गुन्हेगारांना धाक नसल्याची स्थिती झाली आहे. चंदननगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खराडी परिसरात पार्किंगच्या वादातून एका महिलेला पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

Pune Crime news
Pune Crime news

Pune Crime News : पुण्यात गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरला नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे कोयता गँगचा उच्छाद सुरू आहे. तर तरुण देखील गुन्हेगारीकडे वळत आहेत. क्षुल्लक कारणावरून एकमेकांच्या जीव घेण्याच्या घटना देखील वाढल्या आहे. त्यामुळे पुणे खरच सुरक्षित आहे आहे का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. पुण्यात अशीच हादरवणारी घटना उघडकीस आली आहे. पार्किंगच्या वादातून काही टोळक्याने एका महिलेला जीवंत जाळण्याचा प्रयत्न केला आहे. या हल्ल्यात महिला थोडक्यात बचावली आहे. मात्र, तिच्या गाडीचे नुकसान झाले आहे. ही घटना पुण्यातील चंदननगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खराडी परिसरात पार्किंगच्या वादातून झाली.

kamal haasan : तामिळ सुपरस्टार कमल हासन इंडिया आघाडीत सहभागी होणार! निवडणूकही लढणार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी महेश राजे यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार धिरज दिलीप सपाटे (वय २८, नं १ लेन नं १ तुकारामनगर खराडी), आकाश सोकीन सोदे (वय २३, रा चंदननगर), नयत नितीन गायकवाड (वय १९, रा साईनाथनगर वडगाव) सुरज रविंद्र बोरुड़े (वय २३, रा उबाळेनगर), विशाल ससाने वय २० रा बीजेएस कॉलेज जवळ वाघोली) अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. तर धिरज सपाटे हा फरार असून तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.

Sharad Pawar : भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा असलेला शरद पवारांचा तो विश्वासू नेता कोण?

या घटनेची हकिगत अशी की महेश राजे व या प्रकरणातील आरोपी हे एकाच परीसरात राहतात. त्यांच्यात गेल्या काही दिवसांपासून पार्किंग वरुनवाद सुरू होते. १७ फेब्रुवारी रोजी हा वाद टोकाला गेला. यावेळी आरोपी आणि त्याच्या १३ साथीदारांनी दुचाकीवर येत फिर्यादी यांच्या कारच्या काचा फोडल्या. ऐवढेच नाही तर आरोपीनी, त्यांच्या गाडीवर पेट्रोल टाकून आग लावली. पेट्रोल चारचाकी गाडीवर पडल्याने गाडीने पेट घेतला.

ज्यात चारचाकी गाडीचा सीट जळली. यावेळी फिर्यादी या घराबाहेर आल्या असत्या आरोपींनी त्यांच्यावर देखील पेट्रोल टाकून त्यांना पेटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या घरात पळून गेल्याने थोडक्यात बचावल्या. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. सर्व आरोपींच्या हातात लाठ्या-काठ्या असल्याचे स्पष्ट दिसत आहे. काहींनी तोंडाला रुमाल बांधला होता. आरोपींनी महिलेच्या घरासमोर उभ्या असलेल्या गाडीच्या काचा देखील फोडल्या. यानंतर आरोपी हे फरार झाले. महिला जर घरात गेली नसती तर अनर्थ झाला असता.

IPL_Entry_Point

विभाग