सैफ अली खानवर चाकूने इतके वार का केले, घरात कसा घुसला? हल्लेखारानं पोलिसांना सगळं सांगितलं
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  सैफ अली खानवर चाकूने इतके वार का केले, घरात कसा घुसला? हल्लेखारानं पोलिसांना सगळं सांगितलं

सैफ अली खानवर चाकूने इतके वार का केले, घरात कसा घुसला? हल्लेखारानं पोलिसांना सगळं सांगितलं

Jan 21, 2025 08:34 PM IST

Saif Ali Khan : सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याबाबत पोलिसांनी एक नवीन अपडेट दिले आहे, जे अत्यंत धक्कादायक आहे. हल्लेखोराने सैफवर चाकूने हल्ला का केला हे पोलिसांनी स्पष्ट केले.

सैफ अली खान
सैफ अली खान

अभिनेता सैफ अली खान आता पाच दिवसानंतर रुग्णालयातून घरी परतला आहे. अभिनेत्याला मंगळवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. गेल्या आठवड्यात बुधवारी रात्री एका व्यक्तीने सैफच्या घरात घुसून त्याच्यावर चाकूने हल्ला केला होता. अभिनेत्यावर २ शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. मंगळवारी पोलिसांनी सांगितले की, सैफच्या घट्ट पकडीतून स्वतःला मुक्त करण्यासाठी आरोपीने अभिनेत्यावर हल्ला केला. हल्ल्यानंतर तो इमारतीच्या गार्डनमध्ये २ तास लपून बसला होता.

सैफ अली खान हल्ला प्रकरणी अटक केलेल्या आरोपीची पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी आरोपी शरीफुल इस्लाम शहजाद मोहम्मद रोहिल्ला अमीन फकीर याला अटक करून काही प्रश्न विचारले होते. त्याची त्याने उत्तरे दिली आहेत. आरोपीने बांगलादेशातून भारतात घुसखोरीआपले नाव बदलून विजय दास असे ठेवले होते. या नावाने तो मुंबईमध्ये राहत होता.

घरात कसा घुसला?

शरीफुल इस्लाम शहजादा मोहम्मद रोहिल्ला अमीन फकीर असे या हल्लेखोराचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपी बाथरूमच्या इमारतीतून चोरी करण्याच्या उद्देशाने अभिनेत्याच्या फ्लॅटमध्ये घुसला. घरात प्रवेश केल्यानंतर सैफच्या स्टाफने त्याला पाहिल्यावर दोघांमध्ये वाद झाला. सैफ तिथे आल्यावर त्याने त्याला पकडले. सैफच्या तावडीतून स्वत:ला सोडवण्यासाठी त्याने सैफवर चाकूने अनेक वार केले.

गार्डनमध्ये २ तास लपून बसला -

पोलिसांनी पुढे सांगितले की, सैफ जखमी झाला आणि त्याची पकड कमकुवत झाली तेव्हा हल्लेखोर तेथून पळून गेला. यानंतर हल्लेखोर घरात आहे, असा विचार करून सैफने पुन्हा मेन गेट बंद केले. पण तो ज्या वाटेने आत शिरला होता तिथून निघून गेला. त्यानंतर हल्लेखोर २ तास बागेत लपून बसला.

पोलिसांनी यापूर्वी सांगितले होते की, हल्लेखोराच्या बोटांचे ठसे घटनास्थळावर सापडले आहेत, ज्यात बाथरूमच्या खिडकीतून तो आत आला आणि बाहेर गेला. हल्लेखोर ५ महिन्यांपासून मुंबईत दुसऱ्या नावाने राहत होता. त्याला रविवारी मुंबई कोर्टाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

सैफ अली खानवर हल्ला का केला?

शहजादने पोलिसांना सांगितले की, 'सैफ अली खानने त्याला घट्ट पकडले होते. त्याच्या तावडीतून सुटण्यासाठी त्याने सैफच्या पाठीत चाकूने वार केले व तेथून पळून गेला. आरोपी चोरीच्या उद्देशाने बाथरूमच्या खिडकीतून आतमध्ये घुसला होता.

 

बांगलादेशातून मुंबईत कसा आला?

बांगलादेशातील झालोकाथी जिल्ह्यातील असलेला शहजाद पाच महिन्यांपेक्षा अधिक काळापासून मुंबईत राहत आहे. तो छोटी-मोठी काम करायचा. हाऊसकीपिंग एजन्सीमध्ये तो काम करायला लागला होता. शहजादने भारतात घुसखोरी केल्यावर नाव बदलले. विजय दास असे नाव ठेवले. सात महिन्यांपूर्वी तो भारतात आला होता. दावकी नदी पार करून त्याने भारतात प्रवेश केला. घुसखोरी केल्यावर काही आठवडे तो पश्चिम बंगालमध्ये राहिला. त्यानंतर कामाच्या शोधात मुंबईमध्ये आला. एका स्थानिक व्यक्तीच्या आधार कार्डवर त्याने एक सीमकार्ड घेतले. मात्र त्याला आधार कार्ड बनवता आले नाही.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर