Nashik: वाढदिवशी रस्त्यावर गोंधळ घालताना हटकलं, माजी नगरसेविकेच्या पतीसह तिघांवर वार
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nashik: वाढदिवशी रस्त्यावर गोंधळ घालताना हटकलं, माजी नगरसेविकेच्या पतीसह तिघांवर वार

Nashik: वाढदिवशी रस्त्यावर गोंधळ घालताना हटकलं, माजी नगरसेविकेच्या पतीसह तिघांवर वार

May 28, 2024 10:30 AM IST

Nashik former corporators husband attacked News: नाशिक रोड परिसरात मंगळवारी मध्यरात्री माजी नगरसेविकाच्या पतीवर धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला.

नाशिकमध्ये माजी नगरसेविकाच्या पत्नीवर धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला.
नाशिकमध्ये माजी नगरसेविकाच्या पत्नीवर धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला.

Nashik Crime: नाशिकमध्ये प्राणघातक हल्ला, लूटमार, हत्या यांसारख्या घटनेत लक्षणीय वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. यातच नाशिकरोड (Nashik Road) परिसरात मंगळवारी मध्यरात्री माजी नगरसेविकेच्या पतीसह अन्य तिघांवर धारधार शस्त्राने वार केल्याची घटना उघडकीस आली. वाढदिवशी रस्त्यावर गोंधळ घालणाऱ्यांना हटकल्याने जीवघेणा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील कारवाईला सुरुवात केली.

वाढदिवसाचे सेलिब्रेशन करताना हटकलं

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकरोड परिसरात वाढदिवसाचे सेलिब्रेशन करताना काही तरुण रस्त्यावर गोंधळ घालत होते. त्यावेळी माजी नगरसेविकाच्या पतीने त्यांना हटकले. यावर संतापलेल्या तरुणांनी माजी नगरसेविकेच्या पतीसह अन्य तिघांवर धारधार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात जखमी झालेल्या माजी नगरसेविकेच्या पतीसह तिघांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. या हल्लानंतर परिसरात तणावाचे वातावरण पसरले असून नाशिकमध्ये पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहे.

माजी नगरसेविकाच्या पतीवर हल्ला केल्याने परिसरात खळबळ

नाशिकमध्ये खुलेआम वाहनांची तोडफोड, जाळपोळ, लूटमार आणि हत्या यांसारख्या घटना सुरूच आहेत. नाशिक शहरात गेल्या महिन्याभरापासून टोळक्यांकडून तलवारी नाचवत गोळीबार केल्याचे अनेक घटना समोर आल्या आहेत. मात्र, आता माजी नगरसेविकाच्या पतीवर हल्ला केल्याने परिसरात खळबळ माजली आहे. याप्रकरणातील गुन्हेगारांविरोधात कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक लोक करीत आहेत.

नाशिक शहरातील गुन्हेगारीच्या संख्येत वाढ

नाशिक शहरात दहशत निर्माण करणाच्या प्रयत्न करीत असलेल्या गावगुंडांची धरपकड केली जात असतानाही अशा प्रकारच्या घटना थांबायचे नाव घेत नाहीत. नाशिकमध्ये दरवर्षी २५ ते ३० हत्येच्या घटना घडत असल्याचे निदर्शनास आले. यावरूनच लक्षात येते की, नाशिक शहर झपाट्याने गुन्हेगारीकडे वळत आहे. एकीकडे पोलिसांकडून अशा गंभीर घटनांमध्ये तडीपारी, स्थानबद्धता, मोक्काच्या कारवाया केल्या जात असल्या तरी नाशिकची कायदा सुव्यवस्था रुळावर येत नसल्याचे चित्र आहे. 

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर