Manoj Jarange Patil on Devendra Fadanvis : मराठा आरक्षणाच्या मुद्यावारून मनोज जरांगे पाटील पुन्हा आंदोलन करण्याच्या मनस्थितीत आहेत. ओबीसी आरक्षण आणि सगे सोयरेच्या मुद्यावरून ते राज्यभर दौरा करणार आहे. जरांगे पाटील यांनी पुन्हा सरकारवर टीका करायला सुरवात केली आहे. सरकारने दडपशाही करत असल्याचा आरोप त्यांनी केला असून भाजपच्या महिला कार्यकर्त्यांना माझ्यावर हल्ला करण्यास पाठवल्याचा आरोप त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर केला आहे. जरांगे पाटील यांच्या या आरोपावरून खळबळ उडाली आहे.
मनोज जरांगे पाटील हे आज रविवारी बीड जिल्ह्यातील वानगाव फाटा येथे आले होते. या ठिकाणी त्यांनी ग्रामस्थांसोबट बैठक घेतली. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांसही बोलतांना वरील टीका केली. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी सरकारच्या दबावारून उपोषण मागे घेतले आहे. त्यांनी उपचार घेतले आहे. दरम्यान, ते मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे या मागणीवर ठाम आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटील पुन्हा राज्यभर दौरे काढणार आहेत.
प्रसारमाध्यमांशी बोलतांना जरांगे पाटील म्हणाले, 'फडणवीस यांचा महिला कार्यकर्त्यांकडून माझ्यावर हल्ला करण्याचा डाव होता, हा हल्ला संभाजीनगर येथे होणार होता. भाजपच्या महिला कार्यकर्त्या मला भेटण्यासाठी आल्या होत्या. एवढ्या खालच्या दर्जाला जाणे हे गृहमंत्र्याचे काम नाही. तुम्हाला हे शोभत नाही', अशी टीका त्यांनी केली आहे. पाटील म्हणाले, मी दवाखान्यातून बाहेर का आलो? दवाखान्यात भरती असल्यावर चौकशी होत नाही, लोक चौकशीसाठी दवाखान्यात पळून जातात, पण मी मुद्दाम एसआयटीला सामोरे जण्यासाठी दवाखान्यातून बाहेर आलो आहे.
पाटील पुढे म्हणले, फडणवीस यांनी मराठा आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल केले. ते मराठा द्वेषी आहेत. त्यांच्या सांगण्याबरून बॅनर बोर्ड फाडले जातात. माझ्या राजकीय अजेंडा नाही, फॉर्म कोणीही भरू शकतो, तो लोकशाहीचा अधिकार आहे. सर्वाना आमदार खासदार व्हावं वाटत. मी राजकीय मार्गात पडणार नाही, मी समाजाचा मालक नाही. मी ८-९ तारखेपर्यत वाट पाहणार असून त्यानंतर पुन्हा आंदोन करण्याचा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.