ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या पुण्यानंतर आता नांदेडमध्ये हल्ला झाल्याची बातमी समोर आली आहे. ही घटना नांदेडमध्ये घडली आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी गेलेले ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला झाला आहे. नांदेडच्या कंधार तालुक्यातील बाचोटीमध्ये ही घटना घडली असून या घटनेने परिसरात खळबळमाजली आहे.या घटनेत हाके यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. काही दिवसांआधी त्यांच्यावर पुण्यातही हल्ला झाला होता.
बाचोटीगावातदोन गट आमने-सामने आल्याने प्रचंड गोंधळ झाला. लोहा कंधार मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार चंद्रशेखर पाटील यांच्या प्रचारार्थ लक्ष्मण हाके यांची सभा होती. या सभेदरम्यान दोन गट आमनेसामने आल्यानंतर गोंधळा झाला. यावेळी एका गटाने लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला केला.
या हल्ल्यानंतर लक्ष्मण हाके यांनी सांगितले की,आम्ही लोहा कंधार विधानसभा मतदारसंघातील एका अपक्ष उमेदवाराच्या प्रचारासाठी आलो होतो. बाचोटी गावातून आमच्या गाड्यांचा ताफा चालला असताना चेहऱ्याला पांढरा गमछा असलेल्या १०० ते १५० तरुणांच्या गटाने लाठ्या काठ्या घेऊन आमच्या कारवर भ्याड हल्ला केला. माझ्यासोबत लोहा कंधारचे उमेदवारही होते. तरुणांचा घोळका कारच्या बोनेटवर चढून घोषणाबाजी करत होता. त्यांनी जरांगे पाटील यांच्या नावाच्या घोषणा दिल्या.
हाके म्हणाल्या की, जमावाने माझ्या कारच्या काचा फोडल्या. त्यांनी तोंड बांधून हल्ला केला. खरंतर त्यांनी आमने सामने हल्ला करायला पाहिजे होता. ओबीसी समाजाची माणसे निवडणुकीला उभी राहिलेली त्यांना आवडत नाहीत. या भ्याड लोकांना अटक केली नाही, तर उद्या आम्ही सकाळी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढणार आहोत.