Attack on former bjp mla sangita thombre : केज विधानसभेच्या माजी आमदार व भाजप नेत्या प्रा. संगीता ठोंबरे यांच्या कारवर हल्ला झाला आहे. केज तालुक्यातील दहिफळ वड मावली येथे त्यांच्यावर हल्ला झाला. येथे एका कार्यक्रमासाठी गेलेल्या ठोंबरे यांच्यावर मद्यधुंद तरुणाने त्यांच्या असभ्य भाषेत बोलुन त्यांच्या गाडीवर दगडफेक करत गाडीची काच फोडली. या घटनेत चालकासह माजी आमदार संगीता ठोंबरे जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
विजय गदळे असे दगडफेक करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. संगीता ठोंबरे (sangita thombre) केज तालुक्यातील दहिफळ वड माऊली येथील एका कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. दहिफळ वडगाव येथे गेल्यानंतर संगीता ठोंबरे सायंकाळी ऋषी गदळे यांच्या घरी चहा-पानासाठी जात असताना विजय गदळे यांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली.
ऋषी गदळे या कार्यकर्त्याच्या घरी चहापानासाठी जीपमधुन जात असताना बुधवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान मद्यधुंद अवस्थेतील विजय उत्तमराव गदळे यांनी ठोंबरे यांच्याशी असभ्य भाषेत बोलुन त्यांच्या गाडीवर दगडफेक केली. या हल्ल्यात गाडीचा चालकाच्या बाजूचा काच फुटून तो दगड गाडीचा चालक किशोर बबन मोरे यांना लागला. चालकाला लागल्यानंतर तोच दगड गाडीमध्ये बसलेल्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांच्या चेहऱ्याला लागल्याने त्याही गंभीर जखमी झाल्या. दोघांना केज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. याप्रकरणी केज पोलिसात तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
कोणत्या कारणामुळे संगीता ठोंबरे यांच्यावर हल्ला करत त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली हे अद्याप समोर आलेले नाही.
दरम्यान केज येथील उप जिल्हा रूग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार संगीता ठोंबरे यांच्या चेह-यावर दगडाचा गंभीर मार लागला असून त्यांचा सीटी स्कॅन केला जाणार आहे. त्यानंतर जखम किती खोलवर आहे, हे समजणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यामधील आडगावामध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. एका तरुणाने तलाठ्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने शासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. संतोष पवार असे हत्या झालेल्या तलाठ्याचे नाव आहे. तलाठी कार्यालयात काम करत असताना प्रताप कराळे नामक तरुणाने त्यांच्यावर हल्ला केला.