पुण्यातील येरवडा इथं थरकाप उडवणारी घटना; अनैतिक संबंधातून ठेकेदारावर भर रस्त्यात कुऱ्हाडीने केले वार
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  पुण्यातील येरवडा इथं थरकाप उडवणारी घटना; अनैतिक संबंधातून ठेकेदारावर भर रस्त्यात कुऱ्हाडीने केले वार

पुण्यातील येरवडा इथं थरकाप उडवणारी घटना; अनैतिक संबंधातून ठेकेदारावर भर रस्त्यात कुऱ्हाडीने केले वार

Dec 27, 2024 03:25 PM IST

Pune Yerwada Crime : पुण्यात अनैतिक संबंधातून सतीश वाघ यांची हत्या केल्याची घटना ताजी असतांना आणखी एकावर अनैतिक संबंधातून कुऱ्हाडीनेवार करून हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.

पुण्यात अनैतिक संबंधातून ठेकेदारावर भररस्त्यात कुऱ्हाडीने केले वार; येरवडा येथील घटना
पुण्यात अनैतिक संबंधातून ठेकेदारावर भररस्त्यात कुऱ्हाडीने केले वार; येरवडा येथील घटना

Pune Yerwada Crime : पुण्यात गुन्हेगारीच्या घटना वाढल्या आहेत. भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांची अनैतिक संबंधाच्या कारणातून त्यांच्या पत्नीने हत्या केल्याची घटना ताजी असतांना आता आणखी एक अशीच घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील येरवडा परिसरात अनैतिक संबंधाच्या संशयावरून एका ठेकेदारवर कुऱ्हाडीने वार करण्यात आले असून यात ठेकेदार हा गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रितेश परदेशी असं हल्लात जखमी झालेल्या ठेकेदाराचे नाव आहे. परदेशी हे पुण्याच्या येरवडा येथील जयजवान नगर परिसरात राहतात. उमेश वाघमारे असं हल्लेखोर आरोपी तरुणाचे नाव आहे. सोमवारी सकाळी ११ वाजता परदेशी हे त्यांच्या बाइकवर येरवड्यातील जयजवान नगर येथून जात होते. यावेळी उमेश वाघमारे तिथे आला. त्याने कपड्यांमध्ये कुऱ्हाड लपवली होती. हल्ला करण्यापूर्वी त्याने परदेशी यांना अडवलं व त्यांच्यावर कुऱ्हाडीने वार करण्यास सुरुवात केली.

हल्ला होताच परदेशी यांनी देखील प्रतिकार करत हा हल्ला हाताने थोपवून धरला. यामुळे त्यांचा तोल गेल्याने ते बाइकवरून खाली पडले. यावेळी आरोपी वाघमारे याने परदेशी यांच्यावर अनेक वार केले. यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेले नागरिक मदतीसाठी धावून आले. यामुळे आरोपी वाघमारे हा जमावाला पाहून फरार झाला. नागरिकांनी परदेशी यांना दवाखान्यात भरती केले.

जखमी रितेश परदेशी व हल्लेखोर उमेश वाघमारे एकमेकांच्या परिचयाचे असून परदेशी यांचे उमेश वाघमारे यांच्या नात्यातील एका महिलेशी अनैतिक संबंध होते. याची कुणकुण उमेशला लागल्याने त्याने परदेशी यांच्यावर हल्ला करत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या हल्यातून परदेशी हे सुदैवाने वाचले. मात्र, कुऱ्हाडीच्या वारामुळे ते गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी उमेश वाघमारे याचा पोलिस शोध घेत आहेत.

दरम्यान, आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांची देखील अनैतिक संबंधातून हत्या झाली होती.  त्यांची पत्नी मोहिनी वाघ हिने तिचा  प्रियकर अक्षय जावळकर याला ५ लाखांची सुपारी देत ही हत्या घडवून आणली होती. 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर