OMG! गाडीतून उतरली अन् महिलेनं अटल सेतूवरून थेट समुद्रात मारली उडी, केसाला पकडून पोलिसांनी वर ओढलं, पाहा थरारक VIDEO-atal setu woman jumped into sea from atal setu police dragged her by hair navi mumbai ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  OMG! गाडीतून उतरली अन् महिलेनं अटल सेतूवरून थेट समुद्रात मारली उडी, केसाला पकडून पोलिसांनी वर ओढलं, पाहा थरारक VIDEO

OMG! गाडीतून उतरली अन् महिलेनं अटल सेतूवरून थेट समुद्रात मारली उडी, केसाला पकडून पोलिसांनी वर ओढलं, पाहा थरारक VIDEO

Aug 16, 2024 11:04 PM IST

Atal setu : अटल सेतू उड्डाणपुलावरुन उडी मारत एका महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.मात्र केसांमुळे ही महिला सुखरुप बचावली. ही महिला मुलूंड येथे राहणारी आहे.

महिलेनं अटल सेतूवरून थेट समुद्रात मारली उडी
महिलेनं अटल सेतूवरून थेट समुद्रात मारली उडी

Atal Setu :सोशल मीडियावर सतत विविध प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. यापैकी काही व्हिडीओ पाहून खरंच अवाक् व्हायला होतं. असाच एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. एका महिलेने अटल सेतूवरून पाण्यात उडी मारली.मात्र पोलिसांनी तिच्या केसाला पकडून वरती ओढत तिचा जीव वाचवला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

मुंबईतील अटल सेतूवरून आत्महत्या करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. दादारची महिला डॉक्टर तसेच एका अभियंत्याने अटल सेतूनवरून उडी मारून आपलं जीवन संपवल्यानंतर आजही तशीच घटना घडली.अटल सेतू उड्डाणपुलावरुन उडी मारत एका महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.मात्र आयुष्याची दोर मजबूत असल्याने महिला सुखरुप बचावली.

या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. यात दिसते की, आत्महत्या करण्यासाठी महिलेने उडी मारताच तिच्याजवळ उभ्या असलेल्या व्यक्तीने तिच्या केसांना पकडून वरती ओढले. त्याचवेळी मार्गावरून जात असलेली पोलिसांची गाडी थांबली. गाडीतून उतरून ४ ते ५ पोलिसांनी संबंधित महिलेला वरती खेचून तिचे प्राण वाचवले. महिलेला मृत्यूच्या दाढेतून परत आणल्याबद्दल वाहतूक पोलिसांचे कौतुक केले जात आहे. पाच पोलिसांनी एकत्रित प्रयत्न करून महिलेले वरती खेचले. यामुळे महिलेचा जीव वाचला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आत्महत्या करण्याच्या प्रयत्न केलेली महिला ५६ वर्षीय असून ती मुलूंड येथे राहणारी आहे. मुंबईवरून नवी मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर असलेल्या अटल सेतूवरुन उडी मारत तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अटल सेतू उड्डाणपुलावरून आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असलेल्या महिलेचा जीव पोलिसांच्या सतर्कतेने वाचला आहे. नावाशेव्हा वाहतूक पोलिसांनी या महिलेला नवे जीवन दिले आहे. वाहतूक पोलीस कर्मचारी ललित शिरसाठ, किरण मात्रे, यश सोनवणे, मयूर पाटील या चौघांनी महिलेचे प्राण वाचवले आहेत.त्याचबरोबर महिलेसोबत असलेल्या व्यक्तीने तिच्या केसांना पकडून ठेवल्यामुळे तिला वाचवता आहे.