मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Atal Setu Toll: मुंबई ट्रान्स हार्बर लिंक वर कोणत्या वाहनांना किती लागणार टोल? वाचा संपूर्ण माहिती

Atal Setu Toll: मुंबई ट्रान्स हार्बर लिंक वर कोणत्या वाहनांना किती लागणार टोल? वाचा संपूर्ण माहिती

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 12, 2024 09:01 PM IST

Mumbai Trance Harbour link Toll Rate : दावाकेला जात आहे की, या पुलावरून प्रवास करताना एका वेळेला ५०० रुपये इंधनाची बचत होईल. मात्र टोलही आकारण्यात येणार आहे. प्रशासनाने याचे दर जाहीर केले आहेत.

Mumbai Trance Harbour link Toll
Mumbai Trance Harbour link Toll

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे उद्घाटन केला. समुद्रावर बनवलेला हा देशातील सर्वात लांब पूल आहे. हा पूल दक्षिण मुंबईतून नवी मुंबईत पोहचण्यासाठी केवळ २० मिनिटांचा वेळ घेईल. यापूर्वी हे अंतर दोन तासांचे होते.

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक पूल 'अटल सेतु' नावाने ओळखला जाईल. डिसेंबर २०१६ मध्ये पंतप्रधान मोदींनी याचे भूमिपूजन केले होते. साडे चार वर्षात याचे बांधकाम पूर्ण होणार होते मात्र कोरोना महामारीमुळे हे काम वेळेवर पूर्ण होऊ शकले नाही. या ब्रीजमुळे मुंबई आणि पुणे प्रवासासाठी लागणारा वेळही कमी करणार आहे. त्याचबरोबर मुंबई पोर्ट आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट दरम्यान कनेक्टिविटी मिळू शकते. नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळ बनत आहे. या पूलाच्या माध्यमातून तेथे कमी वेळेत जात येईल.

 

अटल सेतूवरून प्रवास करताना लागणाऱ्या टोलचे दरपत्रक
अटल सेतूवरून प्रवास करताना लागणाऱ्या टोलचे दरपत्रक

अटल सेतूवर कोणत्या वाहनांना किती टोल?

दावाकेला जात आहे की, या पुलावरून प्रवास करताना एका वेळेला ५०० रुपये इंधनाची बचत होईल. मात्र टोलचा दणकाही मोठा बसणार आहे. वाहननिहाय टोलचा दर खालीलप्रमाणे -

चारचाकी गाडी = सिंगल जर्नी-२५०, रिटर्न जर्नी -३७५ , रोजचा पास -६२५,महिन्याचा पास -१२हजार५०० रुपये

एलसीव्ही/ मिनी बस = सिंगल जर्नी -४००,रिटर्न जर्नी -६००,रोजचा पास – १ हजार, महिन्याचा पास – २० हजार रुपये.

जाहिरात

बस/2एक्सेल ट्रक = सिंगल जर्नी -८३०,रिटर्न जर्नी -१२४५, रोजचा पास -२०७५, महिन्याचा पास – ४१ हजार ५०० रुपये.

एमव्ही ३ एक्सेल = सिंगल जर्नी -९०५, रिटर्न जर्नी -१३६०,रोजचा पास -२२६५, महिन्याचा पास –४५ हजार २५० रुपये

एमव्ही ४ ते ६ एक्सेल = सिंगल जर्नी -१३००, रिटर्न जर्नी-१९५०, रोजचा पास -३२५०, महिन्याचा पास -६५ हजार रुपये

ओव्हरसाईझड व्हेईकल = सिंगल जर्नी -१५८०,रिटर्न जर्नी -२३७०,रोजचा पास -३९५०,महिन्याचा पास –७९ हजार रुपये.

कोणत्या वाहनाना परवानगी?

मुंबई वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार, टॅक्सी, लाइट मोटर व्हेईकल, मिनी बस, टू-एक्सल बस, छोटे ट्रक प्रवास करू शकतात.

कोणत्या वाहनांना प्रवासास बंदी?

मोटर सायकिल, मोपेड, थ्री-व्हीलर टॅम्पो, ऑटो रिक्शा, ट्रॅक्टर, स्लो मूविंग व्हीकल आदींना परवानगी नाही. त्याचबरोबर बैलगाडीही ब्रीजवरून जाऊ शकणार नाही.

स्पीड लिमिट काय असणार?

मुंबई पोलिसांनी या पूलावर १०० किलोमीटर प्रति तास वेगमर्यादा निश्चित केली आहे. मात्र पुलावर चढताना व उतरताना वेगमर्यादा ४० किलोमीटर प्रति तास असेल.

WhatsApp channel