मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Auto on Atal Setu : परवानगी नसतानाही अटल सेतू पुलावर घुसली रिक्षा, गुन्हा दाखल

Auto on Atal Setu : परवानगी नसतानाही अटल सेतू पुलावर घुसली रिक्षा, गुन्हा दाखल

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jan 17, 2024 09:31 AM IST

Auto Rickshaw on Mumbai Trans Harbour Link : अटबिहारी वाजपेयी शिवडी- न्हावा शेवा अटल सेतूवरून प्रवास करताना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Mumbai Trans Harbour Link
Mumbai Trans Harbour Link

MTHL Autorickshaw News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई ट्रान्स हार्बर लिंक म्हणजेच अटबिहारी वाजपेयी शिवडी- न्हावा शेवा अटल सेतूचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर हा पूल सर्व सामान्यांसाठी खुला करण्यात आला आहे. मात्र, अटल सेतू संबंधित अनेक बातम्या समोर येऊ लागल्या आहेत. अटल सेतूवरून प्रवास करताना अनेक प्रवासी रस्त्यात वाहने थांबवून सेल्फी आणि फोटो काढताना दिसत आहेत. अशा वाहनचालकांचे चालान कापले जात आहेत. यातच परवानगी नसतानाही अटल सेतू पूलावरून प्रवास केल्याबद्दल ऑटोरिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. वाहतूक पोलिसांनी ऑटोचालकाविरुद्ध 'रॅश ड्रायव्हिंग' आणि 'इतरांचा जीव धोक्यात घालणे' या आयपीसी अंतर्गत गुन्हा दाखल केला.

दरम्यान, मंगळवारी संध्याकाळपर्यंत अटल सेतू पूलावर वाहने थांबवून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी १४ जणांवर कारवाई करण्यात आली. अटल सेतूवर वाहने थांबवून स्वत:सह इतरांचाही जीव धोक्यात घालू नका, अशा वाहनचालकांविरोधात गुन्हा दाखल केला जाऊ शकतो, असा इशारा मुंबई वाहतूक पोलिसांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलद्वारे दिला. मात्र, अद्याप कोणत्याही वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. संबंधित ऑटोरिक्षाचालकाविरुद्ध वाहतूक उल्लंघनाचा पहिला एफआयआर नोंदवण्यात आला.

मुंबईला रायगडमधल्या उरण तालुक्याशी जोडण्यासाठी उभारण्यात आलेला शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतू शुक्रवारी नागरिकांसाठी खुला करण्यात आला. या मार्गावर एकेरी प्रवासासाठी अडीचशे रुपये टोल आकारले जात आहे.

अटल सेतूमुळे मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील अंतर आता दोन तासांवरून २० मिनिटांवर आले. पुलावरील वेगमर्यादा १०० किमी प्रतितास असल्याने कोणताही धोका पत्करायचा नाही. मात्र, तरीही अनेकजण वाहन थांबवून फोटोशूट करताना दिसत आहेत. एमएमआरडीएने मुंबई वाहतूक पोलिसांना अशा वाहनचालकांविरोधात दंडात्मक कारवाई करण्याचे आवाहन केले.

WhatsApp channel

विभाग