Nagpur murder : बॉसच्या त्रासाला वैतागले! नागपूरमध्ये आयटी कंपनीतील सहाय्यक व्यवस्थापकाची सहकाऱ्यांनी केली हत्या-assistant manager in an it company was killed by his colleague due to bossing nagpur crime news ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nagpur murder : बॉसच्या त्रासाला वैतागले! नागपूरमध्ये आयटी कंपनीतील सहाय्यक व्यवस्थापकाची सहकाऱ्यांनी केली हत्या

Nagpur murder : बॉसच्या त्रासाला वैतागले! नागपूरमध्ये आयटी कंपनीतील सहाय्यक व्यवस्थापकाची सहकाऱ्यांनी केली हत्या

Feb 22, 2024 08:27 AM IST

Nagpur Crime : नागपूरमध्ये एका आयटी कंपनीतील बॉसच्या बोसगिरीला वैतागल्याने एका सहाय्यक व्यवस्थापकाची सहकाऱ्याने हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Nagpur Crime
Nagpur Crime

Nagpur murder news : नागपूर येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बॉसच्या त्रासाला वैतागलेल्या आयटी क्षेत्रातील एका कर्मचाऱ्याने आपल्या बॉसची हत्या केल्याचे उघड झाले आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. सुरुवातीला आरोपींनी त्याचा अपघात झाल्याचा बनाव केला. मात्र चौकशीतून सत्य उघडकीस आले. बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली.

Farmer protest : शेतकरी आंदोलन दोन दिवसांसाठी स्थगित! कारण काय?

एल देवनाथन उर्फ एन.आर. लक्ष्मीनरसिंहम (वय ४१, फरीदाबाद, हरयाणा) असे खून झालेल्या बॉसचे नाव आहे. देवनाथ हे मिहान येथील हेक्सावेअर टेक्नॉलॉजी येथे १० महिन्यांपासून सहायक व्यवस्थापक पदावर कार्यरत होते. तसेच नागपुरातील मनिषनगरातील अग्निरथ संकुल येथे राहत होते. तर गौरव भीमसेन चंदेल (३२, बैतुल, मध्यप्रदेश) व पवन अनिल गुप्ता (हलवाई) (२८, अनुपपूर, मध्यप्रदेश) असे आरोपींचे नाव आहे. हे दोघेही एकाच कंपनीत काम करत होते. तर दोघांपैकी पवन हा देवनाथन यांचा रूम पार्टनरदेखील होता. दोघेही कामात अनेकदा चुका करायचे व वरिष्ठ असल्यामुळे देवनाथन त्यांच्यावर बॉसगिरी करत रागवायचा. यामुळे दोघांनाही त्यांचा अपमान झाल्याचे वाटत होते. यातूनच त्यांनी देवधरची हत्या केली.

पुणे ड्रग्ज प्रकरणाचे सांगली कनेक्शन; मीठाच्या पोत्यात लपवलेलं तब्बल ३०० कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त

देवनाथन बॉसिंगला दोघेही वैतागले होते. यामुळे त्यांनी त्याचा काटा काढण्याचे ठरवले. हे तिघेही बऱ्याचदा देवनाथन व पवनच्या रूमवर पार्टी करायचे. सोमवारी मध्यरात्रीदेखील तिघे पार्टी करत होते. यावेळी कामात होणाऱ्या चुका मी सहन करणार नाही. यानंतर चुका झाल्यानंतर नोकरीवरून काढून टाकेल' अशी धमकी देवनाथनने दिल्यावर दोघेही संतापले. यावेळी दारूच्या नशेत त्यांनी देवनाथनच्या छातीत चाकू भोसकला. यात देवनाथनचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, त्यानी त्याच्या आपघाताचा बनाव केला. देवनाथन खाली पडल्याचे सांगून त्याच्या छातीला पट्टी बांधून त्याला दवाखान्यात नेले. मात्र त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.

या घटनेची माहिती देवनाथन यांचे वडील एन. आर. लक्ष्मी नरसिंहम (वय ६८) व लहान भाऊ एल, देवराजन (वय ३७, फरीदाबाद, हरयाणा) यांना देण्यात आली. पोलिसांना या प्रकरणात संशय आलाच होता. आरोपींची झाडाझडती घेतली असता त्यांनी हत्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी या प्रकरणात दोघांविरोधातही गुन्हा दाखल करत अटक केली आहे.

Whats_app_banner
विभाग