मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  विधानसभा २०२४ साठी शिवसेना आणि भाजपा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.. शिंदे गटाला ५० हून कमी जागा!

विधानसभा २०२४ साठी शिवसेना आणि भाजपा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.. शिंदे गटाला ५० हून कमी जागा!

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 18, 2023 12:03 AM IST

Assembly elections 2024 Formula : शिवसेना शिंदे गट आणि भाजपा यांचा २०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठीचा फॉर्म्युला ठरला आहे. भाजप २४० जागा लढवणार आहे तर शिंदे गटाला ५० हून कमी जागा मिळणार आहेत.

शिवसेना आणि भाजपा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
शिवसेना आणि भाजपा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला

महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठी २०१४ मध्ये पंचवार्षिक निवडणूक होणार आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा २४० जागा लढवणार तर ४८ जागा या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दिल्या जाणार आहेत. २०२४ मध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपा एकत्र  निवडणूक लढणार आहेत. दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे, अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.

चंद्रशेखर बावनकुळे  म्हणाले की, शिवसेना शिंदे गट आणि भाजपा यांचा २०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठीचा फॉर्म्युला ठरला आहे. एकनाथ शिंदे यांनी २१ जून २०२२ महाविकास आघाडीमधून बाहेर पडत थेट पक्ष नेतृत्वाला आव्हान दिलं होतं. त्यानंतर एकनाथ शिंदे हे भाजपाच्या पाठिंब्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. आता निवडणूक आयोगाकडून शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह दोन्हीही शिंदेंना मिळालं आहे. अशात आता २०२४ चा जागा वाटपाचा भाजपा आणि शिवसेनेचा फॉर्म्युला ठरला आहे.

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्याच भाषणात २०२४ च्या निवडणुकीत २०० जागा जिंकण्याची घोषणा केली होती. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे ४० आमदार आले आहेत.  पुढच्या निवडणुकीत शिंदे गटाला ४८ जागा दिल्या जाणार आहेत असं चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केलं आहे.

बावनकुळे म्हणाले की, शिवसेनेत ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट पडले आहेत. शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवसेनेत पडलेली ही सर्वात मोठी फूट आहे. शिंदे विरूद्ध ठाकरे यांच्यातील शिवसेना कुणाची हा वाद सुप्रीम कोर्टातही गेला आहे. तो निवडणूक आयोगाच्याही दारात होता. तिथे पक्षचिन्ह आणि नाव एकनाथ शिंदे यांना मिळालं आहे. तर सुप्रीम कोर्टातली सुनावणी नऊ महिन्यांनी पूर्ण झाली आहे. त्यावरचा निकाल येणं अपेक्षित आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपा आणि शिंदे गटाची शिवसेना यांच्यातल्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. शिंदे गटाला ४८ जागा दिल्या जातील तर भाजपा २४० जागांवर विधानसभा निवडणूक लढवणार आहे असं चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलं आहे. त्यामुळे आता यावर शिंदे गटाच्या शिवसेनेकडून अजून काही प्रतिक्रिया आलेली नाही.

IPL_Entry_Point