mahayuti : लाडक्या बहिणींना २१०० रुपये, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन् वृद्धांना पेन्शन, महायुतीचा दहासूत्री जाहीरनामा
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  mahayuti : लाडक्या बहिणींना २१०० रुपये, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन् वृद्धांना पेन्शन, महायुतीचा दहासूत्री जाहीरनामा

mahayuti : लाडक्या बहिणींना २१०० रुपये, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन् वृद्धांना पेन्शन, महायुतीचा दहासूत्री जाहीरनामा

Nov 05, 2024 11:08 PM IST

mahayuti manifesto : लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवून दीड हजारांवरून वाढवून २१०० केले जातील,शेतकऱ्यांच्या कर्जमाफी, वृद्धांना पेन्शन तसेच शेतकरी सन्मान योजनेची व्याप्ती वाढविण्याबाबतची महत्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

mahayuti manifesto for maharashtra assembly election : विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीने आजपासून प्रचाराचा शुभारंभ केला असून कोल्हापूरमधील जाहीर सभेतून ‘केलंय काम भारी आता पुढची तयारी’ अशा टॅगलाईनखाली जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवून दीड हजारांवरून वाढवून २१०० केले जातील,  शेतकऱ्यांच्या कर्जमाफी, वृद्धांना पेन्शन तसेच शेतकरी सन्मान योजनेची व्याप्ती वाढविण्याबाबतची महत्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.  (Maharashtra Assembly Election 2024)

कोल्हापुरातील जाहीर सभेच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांनी १० वचनांची घोषणा केली आहे. त्यामध्ये सत्ता पुन्हा आल्यास लाडकी बहीण योजनेच्या पैशात वाढ करणार असल्याचे शिंदे यांनी म्हटले. राज्यातील पोलीस दलात २५ हजार महिलांची भरती केली जाईल. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल. शेतकरी सन्नान योजनेच्या रक्कमेतही वाढ केली जाईल. सध्या १२ हजार दिले जातात, ते १५ हजार रुपये करण्यात येईल असे शिंदे यांनी सांगितले.

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या १० मोठ्या घोषणा -

  1. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपयांवरून २१०० रुपये दिले जाणार. राज्यातील पोलीस दलात २५ हजार महिलांची भरती केली जाणार.
  2. शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला १२ हजारावरून १५ हजार रुपये मिळणार. एमएसपीवर २० टक्के अनुदान दिले जाणार.
  3. प्रत्येक गरिबाला अन्न आणि निवारा दिला जाणार.
  4. वृद्ध पेन्शन धारकांना १५०० वरून २१०० रुपये मिळणार.
  5. राज्यातील जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर ठेवल्या जाणार.
  6. २५ लाख रोजगार निमिर्ती, तसेच १० लाख विद्यार्थ्यांना १० हजार रुपये विद्यावेतन मिळणार.
  7. राज्यातील ग्रामीण भागात ४५,००० गावांत पाणंद रस्ते बांधले जाणार. 
  8. अंगणवाडी आणि आशा सेविकांचे मानधन वाढवून १५ हजार रुपये वेतन करणार.
  9. वीज बिलात ३० टक्के कपात करुन सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर दिला जाणार.
  10. सरकार स्थापनेनंतर १०० दिवसांच्या आत ‘व्हिजन महाराष्ट्र@2029 ‘सादर केले जाणार.

Whats_app_banner