bhiwandi Padmanagar crime : राज्यात तसेच देशात महिला अत्याचाराच्या घटना घडत असतांना आता भिवंडीत एक घटना उघडकीस आली आहे. अनैतिक संबंधातून ही घटना घडली आहे. महिलेचा प्रियकराने महिलेच्या घरात घुसून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. याला विरोध केल्यावरही आरोपीने महिलेशी लगट करून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याने संतप्त झालेल्या महिलेने आरोपीवर स्वयंपाक घरातील उलतन्याने थेट त्याच्या गुप्तांगायवर वार करत त्याला जखमी करत धडा शिकवला आहे. ही घटना शहरातील पद्मानगर परीसरात घडल. आरोपीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
अनिल रच्चा (वय ३१) असे जखमी आरोपी प्रियकराचे नाव आहे. या प्रकरणी २६ वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार व दोन्ही बाजू ऐकून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अनिल रच्चा व महिलेचे प्रेमसंबध असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपी अनिल हा महिलेच्या घरी घुसला होता व तो तिच्या समोर अश्लील चाळे करत होता. त्याने महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न देखील केला. यामुळे संतप्त झालेल्या महिलेने स्वतःच्या बचाव करत स्वयंपाक घरातील उलातन्याने त्याच्या गुप्तांगावर वर केले. यात आरोपी गंभीर जखमी झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि महिला यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध असून सध्या त्यांच्यात काही कारणावरून वाद झाले होते. आरोपी अनिलने महिलेच्या इच्छेविरुद्ध तिच्या घरात जाऊन अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. यामुळे महिलेने त्याला विरोध केला. मात्र, त्याने पुन्हा जबरदस्ती केल्याने महिलेने स्वयंपाक घरातील उलातन्याने अनिलच्या गुप्तांगावर वार करत त्याला गंभीर जखमी केले.
या प्रकरणी तिने पोलिस ठाण्यात जात आरोपीच्या विरोधात तक्रार दिली. तसेच पोलिसांनी आरोपीचे देखील म्हणणं ऐकलं आहे. पीडिता ही एका खासगी शाळेत काम करते. तसेच तिचा पती देखील शाळेतील बसवर वाहन चालकाचे काम करतो. आरोपीने देखील महिलेवर आरोप केले आहे. आरोपी व महिला यांच्यात अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध असून तिनेच त्याला घरी बोलवल्याचे आरोपीने म्हटलं आहे. ऐवढेच नाही तर दोघांमध्ये पूर्वी पासून शरीर संबंध देखील राहिले आहे. त्यांच्यात कुठल्या तरी कारणास्तव वाद झाल्याने ही घटना घडली असल्याचे आरोपीने म्हटलं आहे. या प्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव कुंभार पुढील तपास करत आहेत.