मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ashok Chavan : अशोक चव्हाणांचा आजच भाजप प्रवेश! प्रदेश कार्यालयात देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत हाती घेणार कमळ

Ashok Chavan : अशोक चव्हाणांचा आजच भाजप प्रवेश! प्रदेश कार्यालयात देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत हाती घेणार कमळ

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Feb 13, 2024 10:43 AM IST

Ashok Chavan join BJP today : काँग्रेसमधून बाहेर पडलेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे मोठे नेते अशोक चव्हाण आजच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत माजी आमदार अमर राजूरकर हे देखील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

Ashok Chavan join BJP today
Ashok Chavan join BJP today

Ashok Chavan join BJP today : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काल त्यांच्या काँग्रेसच्या सदस्यत्वचा आणि आमदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश घेणार असल्याचे जाहीर केले. त्यांचा पक्ष प्रवेश हा काही दिवसानंतर होणार  होता. मात्र, भाजपने आजच त्यांच्या पक्ष प्रवेश करून घेणार आहेत. आज दुपारी १२ ते १२.३० च्या दरम्यान, भाजपच्या प्रदेश कार्यालयात ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण हे हात सोडून कमळ हाती धरणार आहेत. त्यांच्यासोबत माजी आमदार अमर राजूरकर हे देखील भाजपमध्ये प्रवेश घेणार आहे. अशोक चव्हाण यांना राज्यसभेचे तिकीट मिळणार असल्याची चर्चा आहे.

Pune Railway fire : पुणे स्थानकात उभी असलेली ट्रेन अचानक पेटली; पाहा धडकी भरवणारे फोटो

राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर झालेल्या विश्वास ठरावाच्या वेळी अशोक चव्हाण यांच्यासह काही आमदार उपस्थित होते. मात्र, तेव्हापासूनच अशोक चव्हाण हे देखील भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा होती. काही महिन्यांपूर्वी अशोक चव्हाण यांनी स्वत: ही चर्चा फेटाळून लावली होती. मात्र, सोमवारी त्यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला. आज ते मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

Supreme Court: उपमुख्यमंत्रीपद घटनाबाह्य नाही; सर्वोच्च न्यायालयाने जनहित याचिका फेटाळली

अशोक चव्हाण यांना राज्यसभेत पाठवण्याची तयारी भाजपने कली आहे. राज्यसभेच्या उमेदवारांसाठी नामांकनाची अंतिम तारीख १५ फेब्रुवारी आहे. या साठी केवळ दोन दिवस उरले असल्याने आजच अशोक चव्हाण यांचा पक्ष प्रवेश केला जाणार आहे. राज्यसभेसाठी  त्यांच्या नावाची घोषणा आज किंवा उद्या होऊ शकते. त्यांनी दिल्लीत भाजपमध्ये प्रवेश करावा आणि गृहमंत्री अमित शहा यांनीही यावेळी उपस्थित राहावे, अशी अशोक चव्हाण यांची इच्छा होती. मात्र ते  महाराष्ट्रातून राज्यसभेवर येणार असल्याचे भाजप नेतृत्वाने त्यांना महाराष्ट्रातूनच भाजपमध्ये  प्रवेश घेण्यास सांगितले.  त्यानुसार  देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत त्यांचा भाजप प्रवेश होणार आहे. अशोक चव्हाण यांच्यानंतर आणखी काही नेतेही काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

गेल्या आठवड्यातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यांच्याच विधानामुळे अशोक चव्हाण राज्यसभेवर जाण्याच्या चर्चांना उधाण आले होते. येत्या दोन दिवसांत निर्णय घेणार असल्याचे ते म्हणाले होते. मात्र, राज्यसभेच्या उमेदवारीसाठी अवघे दोन दिवस उरले असल्याने आजच त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. यामुळे ते राज्यसभेवर जाण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट झाले. या सोबतच भाजपला आणखी एक उमेदवार उभा करायचा आहे. एकूण ६ जागांवर निवडणूक होणार असून भाजप ३ जागांवर विजयी होण्याच्या स्थितीत आहे. ती एक जागा एकनाथ शिंदे आणि एक अजित पवार गटाला दिली जाणार आहे.

काँग्रेसला एकूण एक जागा जिंकता येईल, पण तीही हिसकावून घेण्याची भाजपची तयारी आहे. त्यामुळेच पक्षाने अशोक चव्हाण यांची निवड केली असल्याचे बोलणे जात आहे. आणखी काही आमदारांनीही भाजपमध्ये प्रवेश केल्यास काँग्रेसच्या उमेदवाराला विजय मिळवणे कठीण होणार आहे. अशोक चव्हाण हे मराठवाड्यातील मोठे नेते असून ते बाहेर पडल्यानंतर या भागात काँग्रेस कमकुवत होणार आहे.

WhatsApp channel