मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Viral Video: अशोक चव्हाणांचा भाजपमध्ये प्रवेश अन् फडणवीसांचे जुने व्हिडिओ व्हायरल

Viral Video: अशोक चव्हाणांचा भाजपमध्ये प्रवेश अन् फडणवीसांचे जुने व्हिडिओ व्हायरल

Feb 13, 2024 02:23 PM IST

Devendra Fandnavis Video Viral: अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचा जुना व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis (PTI)

Ashok Chavan Joins BJP: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे मोठे नेते अशोक चव्हाण यांनी काल (सोमवारी, १२ फेब्रुवारी २०२३) पक्ष आणि आमदारकीचा राजीनामा दिला. काँग्रेसची साथ सोडल्यानंतर अवघ्या २४ तासात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.याच पार्श्वभूमीवर आदर्श घोटाळ्यावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अशोक चव्हाण यांच्यावर टीकास्त्र सोडल्याचा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामुळे विरोधकांकडून फडणवीस आणि भाजपच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

अशोक चव्हाण यांनी सोमवारी दुपारी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. तसेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा सादर केला. त्यानंतर आज देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या दरम्यान, आदर्श घोटाळ्यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी अशोक चव्हाण यांच्यावर टीका करतानाचा जुन्हा व्हिडिओ समोर आला आहे. यावरून विरोधकांनी भाजपला घेरले आहे.

देवेंद्र फडणवीसांचा हा व्हिडीओ संजय राऊतांनी ट्विट केला आहे. हा पैसा गेला कोठे, असा सवाल त्यांनी फडणवीसांना विचारला आहे. याशिवाय, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही देवेंद्र फडणवीसांचा २०१४ मधील एक व्हिडीओ रिट्विट केला आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक २०१४ चा निकाल लागण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी एका व्हिडिओद्वारे आदर्श घोटाळा व सिंचन घोटाळ्याची माहिती दिली होती. ज्यात देवेंद्र फडणवीस असे म्हणतात की, "मतदारांनो, तुमचे मत देण्यापूर्वी आदर्श घोटाळ्याचं वास्तव जाणून घ्या." या व्हिडिओमध्ये फडणवीसांनी सिंचन आणि आदर्श घोटाळ्याबाबत बोलताना तत्कालीन महाराष्ट्र सरकार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार, अशोक चव्हाण, काँग्रेस-राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षातीले नेत्यांवर टीका केली होती.

WhatsApp channel
विभाग