आषाढी वारीनिमित्त मध्य रेल्वेचे मोठे पाऊल! पंढरपूर-मिरजसाठी ६४ आषाढी विशेष गाड्या चालवणार
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  आषाढी वारीनिमित्त मध्य रेल्वेचे मोठे पाऊल! पंढरपूर-मिरजसाठी ६४ आषाढी विशेष गाड्या चालवणार

आषाढी वारीनिमित्त मध्य रेल्वेचे मोठे पाऊल! पंढरपूर-मिरजसाठी ६४ आषाढी विशेष गाड्या चालवणार

Jul 06, 2024 02:33 PM IST

Ashadhi Special Trains For Pandharpur: आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे मोठ्या संख्येने भाविक जातात. त्यामुळे आषाढी वारीच्या काळात प्रवाशांची मोठी गर्दी होते. ही गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने ६४ विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे.

आषाढी वारीनिमित्त मध्य रेल्वेचे मोठे पाऊल! पंढरपूर-मिरजसाठी ६४ आषाढी विशेष गाड्या चालवणार
आषाढी वारीनिमित्त मध्य रेल्वेचे मोठे पाऊल! पंढरपूर-मिरजसाठी ६४ आषाढी विशेष गाड्या चालवणार

Ashadhi Special Trains For Pandharpur: आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे मोठ्या संख्येने भाविक जातात. त्यामुळे आषाढी वारीच्या काळात प्रवाशांची मोठी गर्दी होते. ही गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने ६४ विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. या गाड्या नागपूर - मिरज विशेष (२ गाड्या), नागपूर - मिरज विशेष (२ गाड्या), नवी अमरावती - पंढरपूर विशेष (४ गाड्या), खामगाव - पंढरपूर विशेष (४ गाड्या), लातूर - पंढरपूर (१० गाड्या), भुसावळ - पंढरपूर अनारक्षित विशेष (२ गाड्या), मिरज - पंढरपूर अनारक्षित मेमू विशेष (२० गाड्या), मिरज - कुर्डूवाडी अनारक्षित मेमू विशेष (२० गाड्या) मध्य रेल्वे मार्फत चालवल्या जाणार आहेत.

पंढरपूर येथे होणाऱ्या आषाढी यात्रेला येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे पंढरपूर व मिरजसाठी ६४ आषाढी विशेष गाड्या चालवणार आहे. या गाड्यांची माहिती पुढील प्रमाणे,

नागपूर - मिरज विशेष (२ सेवा) ही गाडी क्रमांक ०१२०५ विशेषही १४ जुलै रोजी नागपूर येथून ०८.५० वाजता सुटेल आणि मिरज येथे दुसऱ्या दिवशी ११.५५ वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०१२०६ ही विशेष गाडी १८ जुलै रोजी मिरज येथून १२.५५ वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी १२.२५ वाजता पोहोचेल.

नागपूर - मिरज विशेष (२ सेवा) ही गाडी क्रमांक ०१२०७ विशेष गाडी १५ जुलै रोजी नागपूर येथून ०८.५० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ११.५५ वाजता मिरज येथे पोहोचेल. गाडी क्रमांक ०१२०८ विशेष गाडी १९ जुलै रोजी मिरज येथून १२.५५ वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी १२.२५ वाजता पोहोचेल.

नवी अमरावती - पंढरपूर विशेष (४ सेवा) ही गाडी क्रमांक ०१११९ विशेष नवी अमरावती येथून १३ जुलै आणि १६ जुलै (२ सेवा) रोजी १४.४० वाजता सुटेल आणि पंढरपूर येथे दुसऱ्या दिवशी ०९.१० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०११२० विशेष पंढरपूर येथून १४ व १७ जुलै (२ सेवा) रोजी १९.३० वाजता सुटेल आणि अमरावती येथे दुसऱ्या दिवशी १२.४० वाजता पोहोचेल.

खामगाव - पंढरपूर विशेष (४ सेवा) ही गाडी क्रमांक ०११२१ ही विशेष खामगाव गाडी १४ जुलै आणि १७ जुलै (२ सेवा) रोजी ११.३० वाजता सुटेल आणि पंढरपूर येथे दुसऱ्या दिवशी ०३.३० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०११२२ ही विशेष पंढरपूर येथून १५ जुलै आणि १८ जुलै (२ सेवा) रोजी ०५.०० वाजता सुटेल आणि खामगाव येथे त्याच दिवशी १९.३० वाजता पोहोचेल.

लातूर - पंढरपूर (१० सेवा) ही गाडी क्रमांक ०११०१ ही स्पेशल गाडी लातूर येथून १२ जुलै, १५ जुलै, १६ जुलै, १७ जुलै आणि १९ जुलै (५ सेवा) ला ०७.३० वाजता सुटेल आणि पंढरपूर येथे त्याच दिवशी १२.५० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०११०२ विशेष पंढरपूर येथून १२, १५, १६, १७ आणि १९ (५ सेवा) रोजी १३.५० वाजता सुटेल आणि लातूर येथे त्याच दिवशी १९.२० वाजता पोहोचेल.

भुसावळ - पंढरपूर अनारक्षित विशेष (२ सेवा) गाडी क्रमांक ०११५९ अनारक्षित विशेष भुसावळ येथून १६ जुलै १३.३० वाजता सुटेल आणि पंढरपूर येथे दुसऱ्या दिवशी ३.३० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०११६० ही अनारक्षित विशेष गड पंढरपूर येथून दि. १७ जुलै रोजी २२.३० वाजता सुटेल आणि भुसावळ येथे दुसऱ्या दिवशी १३.०० वाजता पोहोचेल.

मिरज - पंढरपूर अनारक्षित मेमू विशेष (२० सेवा) ही गाडी क्रमांक ०११०७ मेमू विशेष मिरज येथून १२ जुलै ते २१ जुलै दरम्यान, (१० सेवा) ०५.०० वाजता सुटेल आणि पंढरपूर येथे त्याच दिवशी ०७.४० वाजता पोहोचेल.

गाडी क्रमांक ०११०८ मेमू विशेष पंढरपूर ही गाडी १२ १२ जुलै ते २१ जुलै (१० सेवा) दरम्यान ०९.५० वाजता सुटेल आणि मिरज येथे त्याच दिवशी १३.५० वाजता पोहोचेल.

मिरज - कुर्डूवाडी अनारक्षित मेमू विशेष (२० सेवा) गाडी क्रमांक ०१२०९ मेमू विशेष गाडी मिरज येथून १२ जुलै ते २१ जुलै (१० सेवा) पर्यंत १५.१० वाजता सुटेल आणि कुर्डुवाडी येथे त्याच दिवशी १९.०० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०१२१० मेमू विशेष गाडी कुर्डुवाडी येथून १२ जुलै ते २१ जुलै (१० सेवा) रोजी २१.२५ वाजता सुटेल आणि मिरज येथे दुसऱ्या दिवशी ०१.०० वाजता पोहोचेल. या सर्व गाड्यांचे आरक्षण ७ जुलै पासून सुरू होणार आहे.

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर