आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना सानुग्रह अनुदान लागू, अपघाती मृत्यू झाल्यास १० लाखांची मदत जाहीर-asha workers and group promoters ten lakhs in accidental death five lakhs for permanently disability ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना सानुग्रह अनुदान लागू, अपघाती मृत्यू झाल्यास १० लाखांची मदत जाहीर

आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना सानुग्रह अनुदान लागू, अपघाती मृत्यू झाल्यास १० लाखांची मदत जाहीर

Aug 28, 2024 12:16 AM IST

Ashaworkers : आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचा कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू आल्यास त्यांना १० लाखांचे सानुग्रह अनुदान मिळणार आहे.

आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना सानुग्रह अनुदान लागू
आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना सानुग्रह अनुदान लागू

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या कामाचे स्वरूप लक्षात घेता कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू झाल्यास १० लाख व कायमस्वरुपी अंपगत्व आल्यास पाच लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान लागू करण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. याबाबत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी केलेल्या प्रयत्नाला यश आले असून, या संदर्भातील महाराष्ट्र शासनाचा आदेश निर्गमित करण्यात आला आहे. १ एप्रिल, २०२४ पासून हा निर्णय लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना सानुग्रह अनुदान लागू करण्यासाठी प्रति वर्ष अंदाजित १.०५ कोटी इतका आवर्ती निधी मंजूर करण्यात आला आहे. यासाठी आवश्यक असणारा निधी आगामी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात आली आहे.

आरोग्य यंत्रणा, सेवाभावी संस्था व ग्रामस्थ,समाजातील अन्य घटक यांमध्ये आरोग्यासंदर्भात जागरुकता,  सुसंवाद,समन्वय,प्रोत्साहन,निर्माण करण्याच्या दृष्टीने “आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक” महत्वपूर्ण सामाजिक दुवा म्हणून कार्यरत आहेत. राज्यातील आशा स्वयंसेविकांचा माता आरोग्य, बाल आरोग्य, कुटुंब नियोजन इत्यादी कारणांसाठी नियमित गृहभेटी देणे,माता व बालकांना मार्गदर्शन करणे, रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय येथे संदर्भीत करणे अशा प्रकारची कर्तव्ये बजावावी लागतात.

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या कामाचे स्वरूप विचारात घेवून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचा कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू आल्यास त्यांना सानुग्रह अनुदान मिळणार आहे. हीबाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन गोविंदा पथकांच्या पाठीशी – मुख्यमंत्री

हे शासन गोविंदा पथकांच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभे आहे आणि यापुढेही राहील. शासनाकडून गोविंदांसाठी जे जे शक्य आहे ते सर्व काही करण्यात येईल. “लाडक्या बहिणी” प्रमाणेच “सुरक्षित बहीण” ही जबाबदारी देखील शासनाचीच आहे,शासनाने ही जबाबदारी निश्चितपणे स्वीकारली आहे. हे शासन कोणत्याही गुन्हेगाराला सोडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली.

हा उत्सव सुरक्षितपणे साजरा करणे, ही आपली जबाबदारी आहे. आपले कुटुंबीय आपली वाट पाहत असतात. २०११ या वर्षी नऊ थरांचा विक्रम या दहीहंडी उत्सवात झाला होता. “जय जवान” या मित्रमंडळाने हा विक्रम केला होता आणि याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली होती. आपल्याकडे एकापेक्षा एक मित्रमंडळे, दहीहंडी पथके आहेत, जे या खेळामधील विक्रम दरवर्षी मोडताना दिसत आहेत.

परंतु ही सोपी गोष्ट नव्हे. यासाठी वर्षभर मेहनत घ्यावी लागते, कसून सराव करावा लागतो. एकाग्रपणे सांघिक भावनेने या खेळाचे प्राविण्य मिळवावे लागते. या गोविंदाची मेहनत बघून हे शासन आपल्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभे राहील. जे जे शक्य आहे ते सर्व काही गोविंदांसाठी करण्यात येईल. मुख्यमंत्र्यांनी महिला गोविंदा पथकांचेही विशेष अभिनंदन केले.