मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Kolhapur Crime : धक्कादायक! कोल्हापुरात रोहित शर्मा आऊट होताच जल्लोष केल्याने एकाच डोकं फोडलं, जखमी क्रिकेटप्रेमी ठार

Kolhapur Crime : धक्कादायक! कोल्हापुरात रोहित शर्मा आऊट होताच जल्लोष केल्याने एकाच डोकं फोडलं, जखमी क्रिकेटप्रेमी ठार

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 31, 2024 10:59 AM IST

Kolhapur Crime : आयपीएलचे सामने सध्या सुरू असून या सामन्याच्या वादातून एकाचा बळी गेला आहे. रोहित शर्मा आऊट झाल्याने दोघांनी एकाला मारहाण करून त्याची हत्या केली.

कोल्हापुरात रोहित शर्मा आऊट होताच जल्लोष केल्याने एकाच डोकं फोडलं, जखमी क्रिकेटप्रेमी ठार
कोल्हापुरात रोहित शर्मा आऊट होताच जल्लोष केल्याने एकाच डोकं फोडलं, जखमी क्रिकेटप्रेमी ठार

Kolhapur Crime : सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीसोबत आयपीएलचा हंगाम सुरू आहे. आयपीएलचे संघ आणि त्यांचे खेळाडू मोठ्या प्रमाणात पैसे कमावत असतांना क्रिकेट प्रेमी मात्र, एकमेकांचा संघ जिंकण्या आणि हरण्यावरून वाद घालत आहे. याच वादातून एकाची हत्या करण्यात आल्याची घटना कोल्हापूर येथे घडल्याने खळबळ उडाली आहे. मुंबई आणि हैद्राबादच्या सामन्याच्या दिवशी रोहित शर्मा आऊट झाल्याने मुंबई कशी जिंकणार? असे म्हटल्याने एका व्यक्तीचे डोके फोडून त्याची हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

इंदिरा गांधींनी श्रीलंकेला दिले 'हे' भारतीय बेट गिफ्ट! माहिती अधिकारातून माहिती उघड; राजकारण तापले

बंडोपंत बापूसो तिबिले (वय ६३, रा. हणमंतवाडी) असे हत्या झालेल्या वृद्ध व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी मारहाण करणारे आरोपी बळवंत महादेव झांजगे (वय ५०) आणि सागर सदाशिव झांजगे (वय ३५, दोघे रा. हणमंतवाडी) यांना पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना बुधवारी घडली. तिबीले यांच्यावर उपचार सुरू असतांना आज त्यांचा मृत्यू झाला.

Actor Govinda : अभिनेते गोविंदा लोकसभा निवडणूक लढणार नाहीत; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली ‘ही’ जबाबदारी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध सनराईजर्स हैदराबाद सामना सुरू होता. आरोपी बळवंत झांजगे आणि सागर झांजगे व त्यांच्या परिसरातील काही जण एका व्यक्तीच्या घरात आयपीएलचा सामना पाहत होते. दोन्ही आरोपी हे मुंबई इंडियन्सचे चाहते होते. सामन्या दरम्यान, हैदराबादने मोठी धाव संख्या उभारली.

ही धाव संख्या पार करत असतांना रोहित शर्मा आउट झाला. यावेळी रोहित शर्मा आऊट झाल्यावर चेन्नईचे चाहते असलेले बंडोपंत तिबिले यांनी जल्लोष करत आनंद साजरा केला. रोहित शर्मा आउट झाल्याने मुंबई इंडियन्स आता जिंकणार नाही असे ते म्हणाले. याचा राग आल्याने आरोपी बळवंत आणि सागर यांना जबर मारहाण केली. यात तिबीले हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने दवाखान्यात भरती करण्यात आले. मात्र, आज त्यांचा उपचारादरम्यान, मृत्यू झाला. अत्यंत छोट्या कारणावरून झालेल्या या घटनेने पोलिसही हादरून गेले आहेत.

IPL_Entry_Point