पुण्यातील २१ मतदारसंघाचे निकाल ४६५ फेऱ्यानंतर होणार स्पष्ट! एका फेरीला लागणार २० मिनिटं, २ वाजेपर्यंत लागणार निकाल
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  पुण्यातील २१ मतदारसंघाचे निकाल ४६५ फेऱ्यानंतर होणार स्पष्ट! एका फेरीला लागणार २० मिनिटं, २ वाजेपर्यंत लागणार निकाल

पुण्यातील २१ मतदारसंघाचे निकाल ४६५ फेऱ्यानंतर होणार स्पष्ट! एका फेरीला लागणार २० मिनिटं, २ वाजेपर्यंत लागणार निकाल

Nov 23, 2024 06:59 AM IST

Maharashtra Vidhansabha nivadnuk : पुण्यातील २१ मतदार संघाची मतमोजणी ही आज होणार आहे. तब्बल ४६५ फेऱ्या मतमोजणीच्या होणार आहे. यानंतर निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे.

पुण्यातील २१ मतदारसंघाचे निकाल ४६५ फेऱ्यानंतर होणार स्पष्ट! एका फेरीला लागणार २० मिनिटं, २ वाजेपर्यंत लागणार निकाल
पुण्यातील २१ मतदारसंघाचे निकाल ४६५ फेऱ्यानंतर होणार स्पष्ट! एका फेरीला लागणार २० मिनिटं, २ वाजेपर्यंत लागणार निकाल (HT)

Maharashtra Vidhansabha nivadnuk : राज्यात आज विजयाचा गुलाल कोण उधळणार हे स्पष्ट होणार आहे. विधानसभेच्या २८८ मतदार संघासाठी आज सकाळी ८ पासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. पुणे जिल्ह्यात देखील २१ मतदार संघासाठी मतमोजणीची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. या मतदारसंघासाठी मतमोजणीच्या ४६५ फेऱ्या होणार आहेत. प्रत्येक फेरीला २० ते ३० मिनिटांचा कालावधी लागणार असून दुपारी २ पर्यंत सर्व निकाल स्पष्ट होतील. मत मोजणीसाठी २ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आहे आहेत. दरम्यान, सर्वाधिक फेऱ्या पुरंदर मतदारसंघासाठी होणार आहे. येथे मतमोजणीच्या ३० फेऱ्या होणार आहेत. तर आंबेगाव मतदारसंघासाठी सर्वांत कमी म्हणजेच १९ फेऱ्या होणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली आहे.

पुण्यात मतमोजणीची तयारी करण्यात आली आहे. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. सर्वात आधी पोस्टल व इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेटच्या मतपत्रिकांची मोजणी होणार आहे. तर त्यानंतर ईव्हीएमच्या मतांची मोजणी सुरू केली जाणार आहे. एका मतदारसंघासाठी मतदान केंद्राच्या संख्येच्या प्रमाणात १४ ते २४ टेबल ठेवण्यात आले आहेत. ईव्हीएम मोजणीसाठी ३९१ टेबल ठेवण्यात आले आहेत. तर पोस्टल मतांसाठी ८७ टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. एका टेबलवर किमान ४०० मते मोजणीसाठी असतील. तर ईव्हीएमच्या एका फेरीसाठी साधारण २० मिनिटे लागणार आहेत. यासाठी २ हजार २३ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.यात सूक्ष्म निरीक्षक ५२८, मतमोजणी पर्यवेक्षक ५५३ तर मतमोजणी सहायक ५७७ नेमण्यात आले आहेत.

पुण्यातील मतदार संघाची 'या' ठिकाणी होणार मतमोजणी

पुण्यातील २१ मतदारसंघाची मतमोजणी वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहे. शहरातील ८ विधानसभा मतदारसंघांची मतमोजणी कोरेगाव पार्क येथील फूड कॉर्पोरेशन इंडियाच्या गोदामात होईल. तर पिंपरी, भोसरी मतदारसंघांची मतमोजणी बालेवाडी येथील क्रीडा संकुल होणार आहे. चिंचवड मतदारसंघाची मतमोजणी कामगार भवन येथे होणार आहे. तर शिरूर मतदारसंघातील मतमोजणी रांजणगाव एमआयडीसी येथे होणार आहे. तर इतर मतदार संघाची मतमोजणी ही संबंधित ठिकाणच्या मतमोजणी केंद्रांवर होणार आहे.

चोख बंदोबस्त, मंतमोजणीच्या ठिकाणी उपस्थित राहणार उमेदवारांचे प्रतिनिधि

प्रत्येक टेबलला मतमोजणीसाठी उमेदवारांचे प्रतिनीधी उपस्थित राहू शकणार आहेत. मतमोजणीच्या ठिकाणी गैरप्रकार टाळण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. स्ट्राँग रूममधून ईव्हीएम बाहेर काढताना आणि मतमोजणीनंतर परत ठेवताना व्हिडीओ रेकॉर्डिंग केले जाणार आहे. फेरीनिहाय मोजणीची घोषणा होणार आहे. याची माहिती नागरिकांना देण्यासाठी मतमोजणी केंद्राबाहेर ध्वनिक्षेपक लावले आहेत.

अशा होणार मंतमोजणीच्या फेऱ्या

जुन्नर २०

आंबेगाव १९

खेड आळंदी २०

शिरूर २०

दौंड २३

इंदापूर २५

बारामती २०

पुरंदर ३०

भोर २४

मावळ २९

चिंचवड २४

पिंपरी २०

भोसरी २२

वडगाव शेरी २२

शिवाजीनगर २०

कोथरुड २०

खडकवासला २५

पर्वती २०

हडपसर २२

पुणे कॅन्टोमेंट २०

कसबा पेठ २०

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर