मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मुंबईतील ८ रेल्वे स्थानकांची नावं बदलण्याची मागणी ‘या’ खासदाराने २०१७ सालीच केली होती, आता झाला निर्णय

मुंबईतील ८ रेल्वे स्थानकांची नावं बदलण्याची मागणी ‘या’ खासदाराने २०१७ सालीच केली होती, आता झाला निर्णय

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 13, 2024 06:27 PM IST

Railway Stations Name Change : मुंबईतील ८ रेल्वे स्टेशन्सची नावे बदलण्याचा निर्णय आज झाला असला तरी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे २०१७ मध्ये निवेदन देत मागणी केली होती.

मुंबईतील ८ स्टेशनची ब्रिटिशकालीन नावे बदलणार
मुंबईतील ८ स्टेशनची ब्रिटिशकालीन नावे बदलणार

मुंबईतील रेल्वे स्टेशनचे इंग्रजी नावे आता इतिहासजमा होणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील आठ रेल्वे स्टेशनची नावे बदलण्यास मंजुरी दिली आहे. केंद्र सरकारच्या अंतिम मंजुरीनंतर रेल्वे स्टेशनचे नाकरण होणार आहे. मुंबईतील ८ रेल्वे स्टेशन्सची नावे बदलण्याचा निर्णय आज झाला असला तरी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे २०१७ मध्ये निवेदन देत मागणी केली होती. हे पत्र आता व्हायरल होत आहे.

या पत्रात लिहिले आहे की,दक्षिण मुंबईतील रेल्वे स्थानकांची ब्रिटिश कालीन नावे बदलून त्या-त्या क्षेत्राची नावे देण्याबाबत मी लोकसभा सभागृहात मागणी करत प्रश्नोत्तर काळात विषय मांडला आहे. तसेच गृमंत्री राजनाथ सिंह व रेल्वेच्या संबंधित अधिकाऱ्यांना कळवले आहे. रेल्वे स्टेशनच्या नाव बदवण्यासाठी राज्य सरकारकडून प्रस्तावित करण्यात सुचवले असल्याचे पत्रात म्हटले आहे.हे पत्र २० एप्रिल २०१७ रोजीचं आहे.

 

२०१७ मधील अरविंद सावंत यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना दिलेले पत्र
२०१७ मधील अरविंद सावंत यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना दिलेले पत्र

दरम्यान शिंदे सरकारने गेल्या तीन दिवसात दोन वेळा कॅबिनेट बैठक घेतल्या सोमवारी झालेल्या बैठकीत ३३ निर्णय घेण्यात आले होते. तर आज झालेल्या बैठकीत २६ निर्णय घेतले गेले. दोन दिवसात सरकारने ५९ प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. यामध्ये अहमदनगर शहराचे नाव बदलणे, पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नाव राजगड ठेवणे, मुंबईतील आठ रेल्वे स्टेशन्सची नावे बदलणे आदि प्रस्तावांना मंजुरी दिली.

नव्या निर्णयानंतर मुंबईतील करी रोड स्टेशनचे नाव लालबाग करण्याचे प्रस्तावित आहे, मरीन लायन्स स्टेशनचे नाव मुंबा देवी, चर्नी रोडचे नाव गिरगाव, कॉटन ग्रीनचे नाव काळाचौकी, डॉकयार्ड रोडला माझगाव आणि किंग्ज सर्कल स्टेशनचे नाव तीर्थंकर पार्श्वनाथ करण्याचा प्रस्ताव आहे.

IPL_Entry_Point