कॅन्सरशी झुंजणाऱ्या वडिलांना लष्करानं दिली साथ! मुलाने एनडीएमध्ये गोल्ड मेडल जिंकत मानले लष्कराचे आभार
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  कॅन्सरशी झुंजणाऱ्या वडिलांना लष्करानं दिली साथ! मुलाने एनडीएमध्ये गोल्ड मेडल जिंकत मानले लष्कराचे आभार

कॅन्सरशी झुंजणाऱ्या वडिलांना लष्करानं दिली साथ! मुलाने एनडीएमध्ये गोल्ड मेडल जिंकत मानले लष्कराचे आभार

Nov 30, 2024 04:12 PM IST

NDA Passing out parade 2024 : वडील कॅन्सरने आजारी असतांना लष्कराने दिलेल्या महागड्या आरोग्य सेवेमुळं भारवलेल्या मुलाने राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात यशस्वी करत गोल्ड मेडल मिळवत प्रथम आला.

कॅन्सरशी झुंजणाऱ्या वडिलांना लष्करानं दिली साथ! मुलाने एनडीएमध्ये गोल्ड मेडल जिंकत मानले लष्कराचे आभार
कॅन्सरशी झुंजणाऱ्या वडिलांना लष्करानं दिली साथ! मुलाने एनडीएमध्ये गोल्ड मेडल जिंकत मानले लष्कराचे आभार

NDA Passing out parade 2024 : वडील लष्करात देशसेवा करत असतांना त्यांना कॅन्सरंनं ग्रासलं. वडील जीवन मरणाशी लढत असतांना ते केवळ एक महिना जगतील असं सांगन्यात आलं. मात्र, आपल्या योद्धाला लष्करानं वाऱ्यावर सोडलं नाही. त्यावर लष्करी वैद्यकीय दवाखान्यात उपचार केले. यामुळे त्यांच्या जगण्याचा कालावधी वाढला. मुलानं हे सर्व डोळ्यांनी पाहिलं.

आपल्या वडिलांचे लष्कराप्रती असलेलं ऋण फेडण्यासाठी त्याने लष्करात जाण्याचं ठरवलं. त्याने इंजिनियर होण्याचं स्वप्न सोडून जिद्दीने एनडीएची तयारी करत पहिल्याचं प्रयत्नात यश मिळवलं. ऐवढेच नाही तर तीन वर्षांचं खडतर प्रशिक्षण घेऊन एनडीएत राष्ट्रपती सुवर्ण पदक पटकावत तिन्ही वर्षात प्रथम आला. अंकित चौधरी असे या ध्येयवेड्या तरुणाचं नाव आहे. तो लष्करात जाऊन वडिलांप्रमाणे देशसेवा करणार आहे.

अंकित चौधरी असे या तरुणाचे नाव असून तो मूळचा राजस्थान येथील सिकर जिल्ह्यातील रहिवाशी आहे. अंकितचे वडील लष्करात होते. तर त्याची आई शिक्षिका आहे. वडिलांनी लष्करात असतांना केलेल्या कामगिरीमुळे त्यांना सेना मेडल बहाल करण्यात आलं होतं. मात्र, लष्करात राहून देशसेवा करत असतांना त्यांना कॅन्सरसारख्या व्याधीने ग्रासलं. कॅन्सरवरील उपचाराचा खर्च मोठा होता. तो त्याच्या कुटुंबीयांना करणं शक्य नव्हतं. दरम्यान, लष्कराने पुढाकार घेत ईसीएच स्कीम अंतर्गत लष्करी रुग्णालयात त्याचा वडिलांवर उपचार केले. त्यांना केवळ एका महिन्याची मुदत देण्यात आली होती. मात्र, चांगल्या उपचारांमुळे त्याचे वडील आणखी काही वर्ष जंगले. लष्कराने केलेली सर्व मदत अंकितने जवळून पहिली. हीच मदत त्याला लष्करात येण्यासाठी प्रवृत्त करणारी ठरली.

अंकितला एक भाऊ असून तो इंजिनियरिंग करत आहे. भावाप्रमाणे त्याला देखील इंजिनियरिंग करायचे होते. मात्र, वडिलांचे ऋण उतरवण्यासाठी एनडीएची तयारी केली. पहिल्याच प्रयत्नात त्याने परीक्षा पास केली. मात्र, परीक्षा पास होऊन नुसता उपयोग नव्हता. पुढचा एसएसबीचा मोठा डोंगर उभा होता. एसएसबी मुलाखत काय असते याची माहिती देखील त्याला नव्हती. मात्र, तो घाबरला नाही. त्याने, जिद्दीने एसएसबीची तयारी केली आणि पाच दिवस चालणाऱ्या या प्रक्रियेतून यशस्वी पणे तो बाहेर पडून एनडीएत दाखल झाला.

एनडीएत दाखल झाला असला तरी, येथील तीन वर्षांचे खडतर प्रशिक्षण त्याला पूर्ण करायचे होते. एनडीएच्या शिस्तबद्ध तालमित तो तयार झाला. तीन वर्षांचे प्रशिक्षण चांगल्या पद्धतीने पूर्ण करून तो राष्ट्रपती सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला.

वडिलांच्या आठवणीने अंकितचे उर आले भरून

एनडीएचा अंतिम पग ओलांडून आता अंकित पुढच्या लष्करी प्रशिक्षणासाठी राष्ट्रीय रक्षा अकादमीत जाणार आहे. ही अकादमी देहराडुन येथे आहे. माध्यमांशी बोलतांना अंकितला वडिलांच्या आठवणीने गहिवरून आले होते. तर त्याच्या आईला देखील आपल्या मुलाचे यश पाहून डोळ्यातून आनंदाश्रू आले होते.

 

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर