Kalyan: कल्याणमध्ये लष्करी जवानाचा महिला पोलिसावर बलात्कार, इन्स्टाग्रामवर झालेली ओळख महागात पडली
Kalyan Rape: कल्याणमध्ये लग्नाचे आमिष दाखवून लष्करी जवानाने एका महिला पोलीसावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
Kalyan News: कल्याणमध्ये एका लष्करी जवानाने महिला पोलिसावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी महिला पोलिसाने कोसळेवाडी पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात तक्रार दिली आहे. पीडिता आणि आरोपी यांच्यात दोन वर्षापूर्वी इन्स्टाग्रामच्या माध्यामातून ओळख झाली होती. या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर वारंवार बलात्कार केला. मात्र, आता आरोपीने जातीचा प्रश्न उपस्थित करत लग्नास नकार दिला, असे पाडिताने तक्रारीत म्हटले आहे.
ट्रेंडिंग न्यूज
मिळालेल्या माहितीनुसार, आकाश जयधर घुले (वय, २८) हा बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपपच्या पुणे खडकी येथील डी. आय. विभागात प्रशिक्षक म्हणून काम करतो. आकाश मूळचा बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील केळगावचा रहिवासी आहे. तर, पीडिता मुंबई पोलीस दलात कार्यरत असून कल्याण येथील रहिवाशी आहे. दोन वर्षापूर्वी तिची ओळख इन्स्टाग्रामच्या माध्यमातून आकाश बरोबर झाली. त्यानंतर ते नियमित एकमेकांशी बोलू लागले. काही दिवसानंतर त्यांचे एकमेकांवर प्रेम जडले. त्यावेळी पीडिताने आपण आदिवासी समाजातील असल्याचे सांगितले होते. तर, आकाशने आपण वंजारी समाजातील असल्याचे सांगितले.
दरम्यान, आकाशने पीडिताला लग्नाचे आमिष दाखवून गेल्या एक वर्षापासून तिच्यावर बलात्कार केला. अलीकडे आकाशचा चुलत भाऊ राजेश घुले याने महिला पोलिसाला संपर्क करुन आकाश आता दुसऱ्या मुलीबरोबर विवाह करणार आहे, असे सांगितले. आकाशने असे काही नसल्याचे पीडितेला सांगितले. त्यानुसार, पीडिता कुटुंबियांसोबत गेल्या शनिवारी आकाशच्या बीडमधील केळगाव येथील घरी पोहचली. आकाशचे कुटुंबीय आणि गावातील पंच समिती उपस्थित होती. बैठकीतील चर्चेनंतर आकाशने महिलेला कुटुंबीयांचा आपल्या लग्नाला विरोध असल्याचे सांगितले. तसेच तू खालच्या जातीची असल्यामुळे आपले लग्न होणार नसल्याचे आकाशने पीडिताला सांगितले. त्यानंतर पीडिताने ताबडतोब पोलीस ठाणे गाठून आकाशविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.