मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Shirur crime : शिरूर तालुक्यात सशस्त्र दरोडा! दरोडेखोरांच्या हल्ल्यात वृद्ध महिला ठार, तर एक जखमी

Pune Shirur crime : शिरूर तालुक्यात सशस्त्र दरोडा! दरोडेखोरांच्या हल्ल्यात वृद्ध महिला ठार, तर एक जखमी

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 18, 2024 11:20 AM IST

Pune Shirur crime : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील अरणगाव येथील ठोंबरे वस्ती येथे काही अज्ञात दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकत एका वृद्ध महिलेची हत्या केली.

अरणगाव येथील ठोंबरे वस्ती येथे काही अज्ञात दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकत एका वृद्ध महिलेची हत्या केली.
अरणगाव येथील ठोंबरे वस्ती येथे काही अज्ञात दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकत एका वृद्ध महिलेची हत्या केली.

Pune Shirur crime : पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे एका हॉटेलमध्ये एकाची हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असतांना रविवारी रात्री शिरूर तालुक्यातील अरणगाव येथील ठोंबरेवस्तीत काही दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकत वृद्ध दाम्पत्याला मारहाण करून सोन्याचांदीचे दागिने आणि रोख रक्कल लुटली. दरोडेखोरांच्या मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने वृद्ध महिलेचा मृत्यू झाला असून वृद्ध व्यक्ति गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे.

shrinivas pawar news : शरद पवारांची साथ सोडणं हा विचारच नालायकपणाचा; श्रीनिवास पवार अजितदादांवर भडकले!

फुलाबाई आनंदा ठोंबरे (वय ६५, ठोंबरेवस्ती, शिरूर) असे दरोडे खोरांच्या हल्ल्यात ठार झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. तर आनंदा सावळेराम ठोंबरे असे जखमी वृद्धाचे नाव आहे. या प्रकरणी आनंदा यांचा मुलगा बाबा ठोंबरे याने पोलिसांत तक्रार दिली आहे.

share market news : गुंतवणूकदारांसाठी खूषखबर! पैशासाठी वाट बघण्याची गरज नाही! व्यवहाराच्या दिवशीच खात्यात येणार पैसे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिरूर तालुक्यातील ठोंबरेवस्ती येथे आनंदा सावळेराम ठोंबरे हे त्यांची पत्नी फुलाबाई आनंदा ठोंबरे यांच्या बरोबर राहतात. रविवारी रात्री ते त्यांची कामे आटोपून झोपले होते. मध्यरात्री ३ च्या सुमारास काही दरोडेखोर हे ठोंबरे यांच्या घरात घुसले. दरम्यान, आवाज झाल्याने ठोंबरे दाम्पत्य जागे झाले. यावेळी दरोडे खोरांनी त्यांना जबर मारहाण केली. तसेच घरातील दागिने आणि रोख रक्कम घेऊन ते पसार झाले, दरोडेखोरांच्या मारहाणीत फुलांबई या गंभीर जखमी झाल्या. यात त्यांच्या जागीच मृत्यू झाला. तर आनंदा ठोंबरे हे गंभीर जखमी झाले आहे. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांचावर उपचार सुरू आहे.

दरम्यान, ठोंबरे यांच्या आरडा ओरडामुळे परिसरातील नागरिक जागे झाले. यामुळे दरोडेखोर पसार झाले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिस घटणास्थळी दाखल झाले असून त्यांनी पंचनामा केला आहे. दरोडेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांनी तपास पथके तयार केली असून सिसिटीव्ही आणि श्वान पथकाच्या साह्याने त्यांचा माग काढण्याचे काम सुरू आहे.

IPL_Entry_Point