Mumbai Boat Capsize : गेटवे ऑफ इंडिया येथून घारापुरीला प्रवाशांना घेऊन निघालेल्या नीलकमळ बोटीला नौदलाची स्पीड बोट येऊन धडकली. या दुर्घटनेत १४ जण ठार झाले. अपघात घडल्यावर अनेक जण मदतीला धावून आले. त्यांनी त्यातडीने प्रवाशांचे प्राण वाचवले. अशाच एका तरुणाने जिवाची पर्वा न करता समुद्रात पडलेल्या २५ नागरिकांचे प्राण वाचवले. आरिफ बामणे असे या तरुणांचे नाव आहे. आरिफ आहे मूळचा दापोली तालुक्यातील दाभोळ येथील रहिवासी असून त्याने केलेल्या कार्यामुळे त्यांचे कौतुक केलं जात आहे.
मुंबईत एलिफंटा येथून निलकमळ बोटीने काही प्रवासी मुंबई येथे गेट वे ऑफ इंडिया येथे येत होते. यावेळी नौदलाची एक स्पीड बोट वेगाने येऊन या बोटीला धडकली. काही वेळातच ही बोट समुद्रात बुडाली. या घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला. ही घटना झाली तेव्हा जवळ असणाऱ्या काही जणांनी तातडीने बचाव कार्य राबवले. आरिफ बामणे याची पूर्वा ही पायलट बोट अपघातग्रस्त निलकमळ बोटीच्या जवळच होती. या दुर्घटनेची माहिती आरिफला नियंत्रण कक्षातून मिळाली. त्यानंतर क्षणाचाही विलंब न करता त्याने तीची बोट घटनास्थळी वळवली. थोड्याच वेळात त्याची बोट ही घटनास्थळी पोहोचली. क्षणाचाही विलंब न लावता बोटीवरील लाइफ जॅकेट व बोय रिंग हे दोरखंडाने बांधून बुडत असलेल्या प्रवाशांच्या दिशेने आरिफने फेकले.
आरिफ हे गेली १८ वर्षे या क्षेत्रात काम करत असून समुद्रातील बचावकार्याचे प्रशिक्षण घेतलेल्या आरिफ यांनी प्रवाशांना वाचवण्यासाठी पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला आपली बोट थांबवली होती. बुडत असलेल्या बोटीतून प्रवासी वाहून त्या दिशेने येत होते. ही बोट अपघात झल्यावर काही वेळातच बुडाली. सर्व प्रवासी जिवाच्या आकांताने ओरडत होते. आरिफ बोट घेऊन घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांच्या बोटीत १८ लाइफ जॅकेट होती. ही लाइफ त्यांनी बुडत असलेल्या नागरिकांना दिली. व त्यांना बोटीवर घेतले. वाचलेल्या प्रवाशांची लाइफ जॅकेट काढून त्यांनी पुनः प्रवाशांना दिली. आरिफ यांच्या या तत्परतेमुळे तब्बल २५ जणांचे प्राण वाचले.
बचाव कार्य राबावत असतांना आरिफला एक लहान मुलगा बुडत असतांना दिसला. हा साडेतीन वर्षाच्या चिमुकल्याला वाचवण्यासाठी क्षणाचा देखील विलंब त्याने लावला नाही. त्याने मुलाला बाहेर काढले. मुलाचा श्वास थांबला होता. त्यांनी त्याला पालथे झोपवले व त्याच्या पोटातून पाणी काढले. यानंतर त्याचा श्वासोच्छवास सुरू झाला. आरिफने केलेल्या या बचाव कार्याचे कौतुक केले जात आहे.
संबंधित बातम्या