Nagpur murder : आईला शिवीगाळ करण्यावरून भावांमध्ये जुंपली! मोठ्यानं केली सख्ख्या धाकट्या भावाची हत्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nagpur murder : आईला शिवीगाळ करण्यावरून भावांमध्ये जुंपली! मोठ्यानं केली सख्ख्या धाकट्या भावाची हत्या

Nagpur murder : आईला शिवीगाळ करण्यावरून भावांमध्ये जुंपली! मोठ्यानं केली सख्ख्या धाकट्या भावाची हत्या

Apr 29, 2024 11:25 AM IST

Nagpur murder : नागपूरच्या टिमकी परिसरात दारू पिऊन आईला शिवीगाळ करणाऱ्या भावाला विरोध केल्याने एका मोठ्या भावाने सख्ख्या लहान भावाची चाकूने भोसकून हत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

आईला शिवीगाळ करण्यावरून भावांमध्ये जुंपली! मोठ्यानं केली सख्ख्या धाकट्या भावाची हत्या
आईला शिवीगाळ करण्यावरून भावांमध्ये जुंपली! मोठ्यानं केली सख्ख्या धाकट्या भावाची हत्या

Nagpur Timki murder : नागपूरच्या टिमकी परिसरात दारू पिऊन आईला शिवीगाळ करणाऱ्या भावाला विरोध केल्याने एका मोठ्या भावाने सख्ख्या लहान भावाची चाकूने भोसकून हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. किरकोळ वादातून झालेल्या या प्रकारामुळे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे.

Viral video : रीलवर कमेंट! भर रस्त्यावर चौघींचा राडा; एकमेकींना फ्री स्टाईल हाणामारी करत घातल्या लाथा-बुक्क्या

गौरव उर्फ गुड्डू सुरेश गोखे (३५, टिमकी) असे हत्या झालेल्या भावाचे नाव आहे. तर दिलीप सुरेश गोखे (५१, टिमकी) असे आरोपी मोठ्या भावाचे नाव आहे. दोघेही एकाच घरात वर खाली राहत होते. दिलीपला दारूचे व्यसन असल्याने दिलीपची बायको त्याला सोडून गेली आहे. ही घटना रविवारी रात्री घडली.

MDH Spices issue : एमडीएच मसाल्यात आढळला टायफॉइडचा बॅक्टेरिया! अमेरिकेनं तातडीनं रोखला आयात होणारा मोठा साठा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गौरव उर्फ गुड्डू सुरेश गोखे व दिलीप सुरेश गोखे हे दोघेही भावंड आहेत. ते एकाच घरात राहत होते. दिलीपला दारूचे व्यसन असल्याने त्याची बायको त्याला सोडून गेली आहे. दिलीप हा त्याच्या आईसोबत रहात होता. रविवारी दिलीप दारू पिऊन घरी आला. त्याने जोरजोराने ओरडण्यास सुरुवात केली. यावेळी दिलीपला त्याच्या आईंने समजावण्याचा प्रयत्न केला.

chhattisgarh accident : पीकअप-बसच्या भीषण अपघात ३ मुलांसह १० जण जागीच ठार; लग्नसमारंभ आटोपून घरी येतांना काळाचा घाला

मात्र, तो दारूच्या नशेत असल्याने समजू शकला नाही. त्याने आणखी जोरजोरात ओरडण्यास सुरुवात करून आईला शिवीगाळ करण्यास सुरवात केली. ऐवढेच नाही तर त्याने नशेत आईवर वीट देखील उगारली. यावेळी गौरव तेथे उपस्थित होता. त्याने देखील भावाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, दिलीप आणखी संतापला. 'तू शांत बसला नाही तर तुझा जीवच घेईन असे म्हणत दिलीप वरच्या मजल्यावर गेला.

तेथून त्याने मोठा चाकू आणला. दारूच्या नशेत त्याने गौरवच्या गळ्यावर सपासप वार केला. यात एक वार त्याच्या गळ्यावर लागून श्वसननलिला तुटल्याने गौरवचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी आले. त्यांनी आरोपी दिलीपला अटक केली. लहान भावाला घारबविण्यासाठी चाकू त्याच्याजवळून फिरविण्याचा प्रयत्न केला असे त्याने चौकशी दरम्यान, पोलिसांना सांगितले. या घटनेमुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले असून आईला मोठा धक्का बसला आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर