AR Rahman News: भारतातील लोकप्रिय संगीतकार ए. आर. रहमान आणि पत्नी सायरा बानो यांनी लग्नाच्या २९ वर्षानंतर विभक्त होण्याची घोषणा केली आहे. सायराच्या वकील वंदना शाह यांनी या जोडप्याच्या विभक्त होण्याच्या निर्णयासंदर्भात अधिकृत निवेदन जारी केले आहे. एआर रहमान यांनी १९९५ मध्ये सायरा बानो सोबत लग्न केले होते. त्यांना खतीजा, रहीमा आणि अमीन ही तीन मुले आहेत.
सायरा बानो यांच्या वकिलाने शेअर केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, 'लग्नाच्या अनेक वर्षांनंतर सायरा यांनी त्यांचे पती ए.आर. रहमान यांच्यापासून वेगळे होण्याचा कठीण निर्णय घेतला. हा निर्णय त्यांच्या नात्यातील महत्त्वपूर्ण भावनिक ताणावानंतर आला. एकमेकांवर त्यांचे नितांत प्रेम असूनही तणाव आणि अडचणींमुळे त्यांच्यामध्ये न भरून निघणारी दरी निर्माण झाली आहे, जी आता भरून काढणे कठीण आहे. सायरा यांनी तणाव आणि वेदनांमधून हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. सायरा या आयुष्यातील कठीण काळातून जात असताना लोकांकडून गोपनीयता बाळगण्याची आणि समजूतदारपणाची विनंती करतात.'
ए.आर. रहमान आणि सायरा बानो यांचे लग्न १९९५ मध्ये झाला. त्यांना ती मुले असून खतिजा, रहीमा आणि आमेन अशी त्यांची नावे आहेत. ए.आर. रेहमान यांचे लग्न त्यांच्या आईने ठरवले होते. काही वर्षांपूर्वी संगीतकार ए. आर. रेहमान यांनी सिमी ग्रेवाल यांच्याशी गप्पा मारताना सांगितले होते की, 'खरे सांगायचे तर, माझ्याकडे मुलगी शोधण्यासाठी वेळ नव्हता. मी २९ वर्षांचा होतो. माझ्यासाठी लग्न करण्याची हीच योग्य वेळ आहे, हे मला माहीत होते. यामुळे मी माझ्या आईला माझ्यासाठी मुलगी बघायला सांगितले.'