सिडकोच्या घरासाठी अर्ज करण्याचा आजचा शेवटचा दिवस! मुदत संपली तरी नागरिकांना करता येणार अर्ज
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  सिडकोच्या घरासाठी अर्ज करण्याचा आजचा शेवटचा दिवस! मुदत संपली तरी नागरिकांना करता येणार अर्ज

सिडकोच्या घरासाठी अर्ज करण्याचा आजचा शेवटचा दिवस! मुदत संपली तरी नागरिकांना करता येणार अर्ज

Jan 10, 2025 01:00 PM IST

CIDCO Lottery : सिडकोच्या घरासाठी अर्ज करण्याची आजचा शेवटचा दिवस आहे. या साठी मुदतवाढ मिळणार नसली तरी नागरिकांना या साठी अर्ज करता येणार आहे.

सिडकोच्या घरासाठी अर्ज करण्याचा आजचा शेवटचा दिवस! मुदत संपली तरी नागरिकांना करता येणार अर्ज
सिडकोच्या घरासाठी अर्ज करण्याचा आजचा शेवटचा दिवस! मुदत संपली तरी नागरिकांना करता येणार अर्ज

CIDCO Lottery : मुंबईत घर घेण्याचे स्वप्न अनेकांचे असते. या स्वप्नपूर्तीसाठी सिडकोने लॉटरी काढली होती. या लॉटरीसाठी अर्ज करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. या लॉटरीसाठी पुन्हा मुदत वाढ मिळणार नसली तरी, नागरिकांना यासाठी अर्ज करण्याची सुविधा सिडको मार्फत देणात आली आहे. सिडकोच्या संकेतस्थळावर नागरिकांना अर्ज करता येणार आहे. 

अर्ज नोंदणीचा पर्याय राहणार नांगरिकांसाठी राहणार खुले 

सिडकोच्या घरासाठी मुदत संपली असली तरी, अर्ज नोंदणीचा पर्याय खुलाच ठेवण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. त्यामुळे लॉटरीची मुदत संपली असली तरी  इच्छुक नागरिकांना घरासाठी अर्ज करता येणार आहे. त्यामुळे या मार्फत सिडकोने नागरिकांना त्यांच्या पसंतीचे घर घेण्यासाठी  आणखी एक संधी सिडकोने उपलब्ध करुन दिली आहे.

२६००० हजार घरांसाठि लॉटरी 

 सिडकोतर्फे नवी मुंबईत एकूण २६०००  सदनिका प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत उपलब्ध करून देण्यात आली आहे.  आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटाकरीता नवी मुंबईतील वाशी, बामणडोंगरी, खारकोपर, खारघर, तळोजा, मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल व  कळंबोली नोडमध्ये उपलब्ध ही घरे तयार करून देण्यात आली आहेत. जास्तीत जास्त नागरिकांना या लॉटरीचा लाभ घेता यावा यासाठी तीन वेळा लॉटरीची मुदत वाढवण्यात आली आहे.  

अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस  

सिडकोच्या लॉटरीसाठी आज अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आहे. नागरिकांना या साठी सिडकोच्या साईटवर ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. या लॉटरीसाठी पुन्हा मुदतवाढ दिली जाणार नाही.  दुसरा टप्प्यात घरांची निवड करण्याच्या मुदतीपर्यंत ग्राहकांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. त्यामुळे मुदत  संपल्यावरही  संकेतस्थळावरील अर्ज नोंदणीचा पर्याय सिडको मार्फत खुला ठेवणार आहे. त्यामुळे  अर्जनोंदणी न केलेल्या ग्राहकांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार आहे. आता पर्यंत  सिडकोच्या घरांसाठी १  लाख ३४  हजार अर्ज नागरिकांनी भरले आहे.  

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर