Mumbai Accident : मुंबईत आणखी एक भीषण अपघात; CSMT भागात बेस्ट बसने एकाला चिरडलं
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Accident : मुंबईत आणखी एक भीषण अपघात; CSMT भागात बेस्ट बसने एकाला चिरडलं

Mumbai Accident : मुंबईत आणखी एक भीषण अपघात; CSMT भागात बेस्ट बसने एकाला चिरडलं

Dec 11, 2024 06:41 PM IST

Mumbai Best Bus Accident : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) परिसरामध्ये बेस्ट बसने एकाला उडवलं. या अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला आहे.

CSMT भागात बेस्ट बसने एकाला चिरडलं
CSMT भागात बेस्ट बसने एकाला चिरडलं

Mumbai Best Bus Accident : मुंबईतील कुर्ल्यातील लाल बहादूर शास्त्री मार्गावर झालेल्या बेस्ट बसच्या अपघाताची घटना ताजी असतानाच आता मुंबईत पुन्हा असाच अपघात झाला आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) परिसरामध्ये बेस्ट बसने एकाला उडवलं. या अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. जीपीओ परिसरामध्ये बेस्ट बसने एका पादचाऱ्याला उडवलं. अपघातानंतर बस चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार A२६ या बसने रस्त्यावरून चालणाऱ्या पादचाऱ्याला उडवलं या घटनेत व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. 

कुर्ला अपघातात ७ जणांचा मृत्यू -

सोमवारी (९ डिसेंबर) रात्री मुंबईच्या कुर्ला भागात बेस्ट बसचा भीषण अपघात झाला. भरधाव बेस्ट बसने अनेक वाहनांना धडक दिली. या अपघातात बस खाली चिरडलेल्या ७ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत ३३  जण जखमी झाले. कुर्ला येथील आंबेडकर नगर परिसरातून ३३२  क्रमांकाची बस अंधेरी कडे निघाली होती, यावेळी बस चालकाचं नियंत्रण सुटलं आणि हा अपघात झाला. याप्रकरणी बस चालक संजय मोरे याला पोलिसांनी अटक केली.

कुर्ला अपघाताचं खरं कारण आलं समोर -

कुर्ला बसमध्ये तांत्रिक बिघाड झाला असावा किंवा चालकाने मद्यप्राशन केले असावे, असा प्राथमिक अंदाज या अपघातानंतर वर्तवण्यात आला होता. मात्र आता पोलीस चौकशीमध्ये धक्कादायक कारण समोर आले आहे. बस अपघातप्रकरणी अटक करण्यात आलेला चालक संजय मोरे हा १०  दिवसांपूर्वीच कंत्राटी कामगार म्हणून कामावर रुजू झाला होता. १ डिसेंबर रोजी तो कामावर रुजू झाला होता आणि त्याला इलेक्ट्रीक बस चालवण्याचा कोणताही अनुभव नव्हता. सोमवारी त्याने पहिल्यांदा बस चालवली. यावेळी बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला, असे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर