मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Anna Hajare: वाईन विक्रीच्या मुद्द्यावरून अण्णा हजारे यांचा शिंदे-फडणवीस सरकारला इशारा

Anna Hajare: वाईन विक्रीच्या मुद्द्यावरून अण्णा हजारे यांचा शिंदे-फडणवीस सरकारला इशारा

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Sep 23, 2022 03:52 PM IST

Anna Hajare: महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना मॉलमध्ये वाईन विक्रीच्या निर्णयाला विरोध करण्यात आला होता. आता शिंदे-फडणवीस सरकारने वाईन विक्रीच्या निर्णयाचे संकेत दिले आहेत.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

Anna Hajare: राज्यात महाविकास आघाडी सरकारची सत्ता असताना मॉलमध्ये वाईन विक्रीचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र राज्यातील जनतेनं आणि भाजपने केलेल्या विरोधानंतर हा निर्णय मागे घ्यावा लागला होता. पण आता राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे - फडणवीस सरकारने पुन्हा मॉलमध्ये वाईन विक्री करण्याचे संकेत दिलेत. राज्य सरकारच्या या निर्णयावरून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी इशारा दिला आहे.

अण्णा हजारे यांनी म्हटलं की, "मॉल संस्कृती ही भारतीय संस्कृती नाही तर परदेशातली संस्कृती आहे. भारतात परदेशातील संस्कृती आणायची आणि तिथे नको त्या गोष्टी विकायला ठेवणं बरोबर नाही. आताचं सरकार मॉल आणि दारू यांसारख्या गोष्टीचा विचार करणार नाही असा मला विश्वास आहे. पण असं काही घडलंच तर आमच्या मार्गाने आम्हाला आंदोलन करावं लागेल."

राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी राज्यात मॉलमध्ये वाईन विक्रीचे संकेत दिले होते. शंभुराज देसाई यांनी म्हटलं की, “मॉलमध्ये वाईन विक्रीचा मसुदा जनतेला खुला केल्यानंतर आम्ही लोकांची मते जाणून घेतली. याबाबत अनेकांनी जुलै महिन्याअखेर सूचना केल्या आहेत. आता या निर्णयाच्या समर्थनात आणि विरोधात किती आहेत याचा अभ्यास केला जात आहे.”

“संबंधित विभागाचे सचिव आणि आयुक्त यावर काम करत असून याचा अहवाल येत्या १५ दिवसात येईल. मी स्वत: याचा अभ्यास करून लोकांची मते जाणून घेईन आणि पुढचा निर्णय घेऊ. तसंच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याची”, माहिती शंभूराज देसाई यांनी दिली.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या