Anna Hazare: ‘ज्या रंगाचा चष्मा असतो, तसे..’; अण्णा हजारेंकडून उद्धव ठाकरे-संजय राऊतांच्या टीकेवर प्रत्युत्तर
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Anna Hazare: ‘ज्या रंगाचा चष्मा असतो, तसे..’; अण्णा हजारेंकडून उद्धव ठाकरे-संजय राऊतांच्या टीकेवर प्रत्युत्तर

Anna Hazare: ‘ज्या रंगाचा चष्मा असतो, तसे..’; अण्णा हजारेंकडून उद्धव ठाकरे-संजय राऊतांच्या टीकेवर प्रत्युत्तर

Published Feb 11, 2025 04:45 PM IST

Anna Hazare On Uddhav Thackeray : ज्या रंगाचा चष्मा असतो त्या रंगाचे जग समोरच्याला दिसते. चष्माच त्या रंगाचा आहे. मग जग तसंच दिसणार, असं प्रत्युत्तर अण्णा हजारे यांनी उद्धव ठाकरे व संजय राऊत यांच्या टीकेवर दिलं आहे.

अण्णा हजारेंकडून उद्धव ठाकरे-संजय राऊतांच्या  टीकेवर प्रत्युत्तर
अण्णा हजारेंकडून उद्धव ठाकरे-संजय राऊतांच्या  टीकेवर प्रत्युत्तर

Anna Hazare On Uddhav Thackeray : दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती, तर दुसरीकडे भाजपने आपली संपूर्ण यंत्रणा दिल्ली निवडणुकीत उतरवली होती. आरोप-प्रत्यारोपांनी दिल्लीसह संपूर्ण देशातील राजकीय वातवरण तापलं होतं. त्यातच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका करत दिल्ली विधानसभा निवडणूक निकालावरही प्रतिक्रिया दिली होती. यावर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) व खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अण्णा हजारेंवर टीका करत महाराष्ट्रात व केंद्रात भाजपच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर येत असताना अण्णा कूसही बदलत नव्हते, असा टोला लगावला. यावर अण्णा हजारे यांनी खरपूस शब्दात समाचार घेतला आहे.

दिल्लीच्या निवडणुकीत बोलणारे अण्णा महाराष्ट्रात भ्रष्टाचाराचे इतके स्फोट झाले. मोदी सरकार असो किंवा शिंदे-फडणवीसांचे सरकार असेल, त्यावेळी अण्णांनी राळेगणमध्ये कूसही बदलली नाही, भ्रष्ट सरकारच्या बाजूने ते उभे राहिले. त्यांची भूमिका संशयास्पद आहे, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली होती. यावरअण्णा हजारे म्हणाले की, ज्या रंगाचा चष्मा असतो त्या रंगाचे जग समोरच्याला दिसते. चष्माच त्या रंगाचा आहे. मग जग तसंच दिसणार.

दिल्लीत केजरीवालांचा पराभव झाला तेव्हा काहींनी झोपेतून उठून प्रतिक्रिया दिली,या उद्धव ठाकरेंच्या टीकेलाही अण्णा हजारे यांनी उत्तर दिले आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारले म्हणून मी केवळ उत्तरे दिली. एरवी मी राजकीय विषयांवर बोलत नाही. पण दिल्लीच्या निकालाबाबत सगळ्यांनीच कौतुक केले आहे. एखादा माणूस चुकला असेल तर चुकू द्यावे. आपण कशाला त्यावर बोलायचे, असे खोचक उत्तर अण्णा हजारेंनी दिले.

संजय राऊत म्हणाले की, राळेगणचे दैवत असलेल्याअण्णा हजारे यांना महात्मा करण्याचे काम अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया यांनीच केले. अण्णा हजारे यांनी दिल्ली कधी पाहिली असती? रामलीला मैदान, जंतर-मंतर रोड कधी पाहिला असता? असा सवाल करत त्यावेळी आंदोलनाला जो काही आवाका दिला त्यानंतर ते देशाला माहिती झाले, असे म्हटले.

Shrikant Ashok Londhe

TwittereMail

श्रीकांत लोंढे हिंदुस्तान टाइम्स-मराठी मध्ये चीफ कन्टेन्ट प्रोड्यूसर आहे. प्रादेशिक, राष्ट्रीय, राजकीय व गुन्हेविषयक बातम्या कव्हर करतो. प्रिंट आणि डिजिटलमध्ये एकूण १४ वर्षांचा अनुभव. यापूर्वी दैनिक लोकमत, लोकमत समाचार, ईनाडू न्यूज, ईटीव्ही-भारत मध्ये रिपोर्टिग आणि डेस्कवरील कामाचा अनुभव. विशेष स्टोरीज, क्रीडा, राजकारण, मनोरंजन तसेच बिझनेसच्या बातम्याही कव्हर करतात.

Whats_app_banner

संबंधित बातम्या